अमरावती गुन्हे शाखा पथकाने तीन मोटरसायकल आरोपींना केली अटक,,,,,,,,, अमरावती येथील छत्री तलाव परिसरात एका युवकाने गळफास लावून केली आत्महत्या = प्रतिनिधी विक्की बाभुळकर, जनता का रक्षक न्यूज अमरावती

0
31

गुन्हे शाखा पथकाने तीन आरोपींना केली अटक

२ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

अमरावती प्रतिनिधी :
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग करीत असताना तीन आरोपींना अटक करून २ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल, चोरीच्या पैशातून घेतलेल्या दोन मोटर सायकल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरी गेट पोलिस स्टेशन हदित पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली त्या माहितीवरून आरोपी अब्दुल इमरान अब्दुल जकिर वय २० वर्ष राहणार सुफियान नगर, सोहेल खान उर्फ सोनू शमी खान वय २२ वर्ष, अस्लम शाह उर्फ गोलू अहमद शाह वय२४ वर्ष दोन्ही राहणार वाहेद नगर यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांची विचारपूस केली असता नागपुरी गेट पोलिस स्टेशन येथील सात गुन्हे उघडकीस केले. तसेच त्यांची चोरीच्या पैशातून दोन मोटर सायकल विकत घेतल्या होत्या त्या जप्त केल्या. तसेच नगदी १ लाख रुपये, सोनी कंपनीचा टीव्ही किंमत २६ हजार रुपये, ३८ ग्रॅम सोने किंमत १ लाख ५२ हजार रुपये असा एकूण २ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

अमरावती प्रतिनिधी
सादिक शहा

कॅमेरामन
विक्की बाभुळकर

््््््््््््््््््््््््््््््््््््््

छत्री तलाव परिसरात एका युवकाने गळफास लावून केली आत्महत्या
छत्री तलाव परिसरात एका अज्ञात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी राजापेठ पोलिसांनी तत्काळ धाव घेवून पंचनामा करून मृतकाचे नाव संघम रवी वरघट वय २६ वर्ष राहणार संजय गांधी नगर सांगितले. आत्महत्येचे कारण अजूनही असपश्ठ.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मॉर्निंग वॉक वर जाणाऱ्या नागरिकांना मृत संघम रवी वरघट याचे शव झाडाला लटकलेले दिसले. याची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. राजापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, नरवाडे आदी, अग्निशामक विभागाचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी पंचनामा केला.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें