अमरावती ग्रामीण पोलिसांनी शासकीय गोदामातून तूर चोरी करणाऱ्या 11 आरोपींना केली अटक, 25 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त . प्रतिनिधी फिरोज खान. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने परतवाडा नागरिक परेशान, यांचा बंदोबस्त करणार कोण- प्रतिनिधी फिरोज खान . वादळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी झाले पिकांचे नुसकान ,त्वरित पंचनामे करा = प्रतिनिधी सुरेंद्र मानेकर. अमरावती येथील यशोदा नगर परिसरात रेतीने भरलेला टिप्पर झाला पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही= प्रतिनिधी विक्की बाभुळकर ,जनता का रक्षक न्यूज

0
41

पोलीस अधीक्षक अमरावती ( ग्रा . ) . ची कार्रवाई शासकीय गोदाम फोडून तुर चोरी करणाऱ्या टोळीतील ११ आरोपींना अटक अचलपुर फिरोज खान पुलिस अधीक्षक ग्रामीण ने शासकीय तूर चोरी चेआरोपी १ ) उमेश डोमाजी बेदुरकर वय ३५ २ ) हेमंत वासुदेवराव खुरसडे वय ३२ ३ ) संतोष अशोकराव डबाले वय ३१ तिन्ही रा . कंपासपुरा जुनीवस्ती बडनेरा ४ ) पंकज उत्तमराव नाले वय २४ ५ ) गौरव दिपकराव भुयार वय ६ ) रोशन देविदास बानते ७ ) रुपेश भगवान ठवकर वय २७ चारही रा.जुनीवस्ती बडनेरा ८ ) धिरजसिंग बबनसिंग परिहार वय ४८ रा.नवीवस्ती बडनेरा ९ ) प्रविण जगतराव शेलोकार वय ३६ रा.निंबोरा बु १० ) उमेश उत्तमराव गलबले वय ३२ ११ ) पंकज सुरेश वाघाडे वय २६ दोन्ही चांदुरवाडी मा.पोलीस अधीक्षक , अमरावती ग्रामिण डॉ.हरी बालाजी एन . यांनी लॉकडावून काळात अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या धान्यचोरीच्या घटना लक्षात घेता व अशा घटनांना आळा बसावा याकरीता स्थानिक गुन्हे शाखा , अमरावती ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून आरोपी अटक करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या . दिनांक ०३ / ९ / २०२० रोजी अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीतील बालाजी वेअर हाऊस येथे रात्री दरम्यान काही अज्ञात इसमांनी गोडावूनचे शटरचे कुलुप तोडून आत मध्ये ठेवलेली शासकीय तुर ३१८ कट्टे किं.अं. ९ लाख रु . ची चोरुन नेली होती . वरुन पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथे अप.क्र . २४८/२०२० कलम ४६१,३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हा उघडकीस यावा याकरीता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पथक अहोरात्र अथक परिश्रम घेत होते . अशा तपासा दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की , चांदुरवाडी येथील उमेश उत्तम गलबले यांचा सदर गुन्हयात सहभाग आहे . वरुन उमेश गलबले यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगितले की , मी सदर गोडावूनची प्रथम पाहणी केली . त्यावरुन मी माझ्या मामेभाऊ उमेश बेदुरकर रा.बडनेरा यास सदर गोडावून फोडण्याकरीता व तेथील धान्य चोरी करण्याकरीता त्याचे साथीदारासह चांदुर रेल्वे येथे बोलाविल्याचे कबुली दिली . उमेश बेदुरकर व त्याचे साथीदार हे दिनांक २ / ९ / २०२० चे रात्री दरम्यान चार मालवाहू वाहन घेवून बालाजी वेअर हाऊस चांदुर रेल्वे येथे पोहचले . त्यांनी गोडावूनचे कंपाऊंडचे कुलुपकोंडा तोडून व नंतर मुख्य शटरचे सुध्दा कुलुप तोडून गोडावूनमधील ३१८ कटटे तुर चारही मालवाहून वाहनात भरुन बडनेरा येथे आणून शासकीय पोत्यातील तुर प्लॅस्टिकच्या व ज्युटच्या पोत्यात पलटी करुन एका खाजगी व्यापारास सदर माल हा शेतकऱ्यांकडून जमा केला असल्याची खोटी बतावणी करुन विकला . अशा माहितीवरुन सदर गुन्हयातील नमुद आरोपी व चोरी गेलेली शासकीय तुर व गुन्हयात वापरलेले चार मालवाहू वाहन व नाफेडचे खाली बारदाना ज्यावर नाफेड तुर खरेदी व इंडिया गवर्नमेंटअसे लिहले बारदाना तपासकामी जप्त करण्यात आला . सदर गुन्हयात एकुण ११ आरोपी , ४ मालवाहू वाहने किं.अं. १६ लाख रु . , गुन्हयात चोरी गेलेली १५ ९ क्विटल तुर किं.अं.९ , २२,००० , शासकीय खाली बारदाना २४० किं.अं .१००० असा एकुण २५,२३,००० रु . मुद्दोमाल आरोपीतांकडून जप्त करण्यात आला असून आरोपीतांनी अशा प्रकारचे केले आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करण्यात येत आहे . सदर गुन्हयातील आरोपी व जप्त मुद्येमाल पुढील कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे यांच्या ताब्यात देण्यात आले . सदरची कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक , डॉ.हरी बालाजी एन . , अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात सपोनि नरेंद्र पेंदोर , स.पो.उप.नि , मुलचंद भांबुरकर , नापोका सचिन मिश्रा , शकील चव्हाण , संदीप लेकुरवाळे युवराज मानमोठे , अमित वानखडे , चेतन दुबे , विशाल भानुसे , मपोका सरीता चौधरी चालक सईद व लोहकरे यांनी केली आहे . । प्रतिनिधी फिरोज खान
जनता का रक्षक न्यूज

््््््््््््््््््््््््््््््््््््
परतवाडा चे नागरिक मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त, यांचा बंदोबस्त कोण करणार.
अचलपुर फिरोज खान:-परतवाडा शहरात सध्या नागरिक मोकाट कुत्र्यांच्या त्रासा कंटाळले आहे पण पालिका प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.
परतवाडा शहरातील कोणत्याही रस्त्यावर फेरफटका मारताना खुप सावधगिरीने चालावे लागत आहे कारण आधिच रस्ते खराब त्यात भर म्हणजे रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे कोठून येऊन चावा घेतील काही सांगता येत नाही काल टिव्ही टाँवर चौक ते पट्टलवार मार्गावर एका लहान कुत्र्याच्या पिलाला कुण्या गाडीवाल्याने ठोस मारली होती त्या ठिकाणी तर दहा बारा कुत्र्यांचा घोळका रस्त्यावर जाणाऱ्या गाडीवाल्यावर धाऊन जात होते त्यात दोन तिन लोकांना चावल्याचेही समजते आजकाल शहरातील कोणत्याही भागात आपल्याला दहाबारा कुत्र्यांचा झुंड आपल्याला हमखास दिसेल त्यावर नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.
प्रतिनिधी फिरोज खान
जनता का रक्षक न्यूज

्््््््््््््््््््््््््््््््््््

काल झालेल्या वादळी पावसामुळे तिवसा परिसरात शेती पिकांचे नुकसान तात्काळ पंचनामे करुण शासनाने मदत द्यावी प्रा दिनेश सुर्यवंशी यांची मागणी
न्यूज़ सुरेन्द्र मानेकर

्््््््््््््््््््््््््््््््््््

यशोदा नगर परिसरात झाला टिपर पलटी

यशोदा नगर येथे चारचाकी वाहन टीपर क्रमांक MH 40 BL 0042 यामध्ये रेती भरलेली होते. तसेच तो यशोदा नगर या परिसरातून पलटत असताना पलटी झाला. दरम्यान रेती असलेला मागचा भाग ट्रली हा पलटी झाला व वाहन चालकाला धक्का लागल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तसेच जेसीबी द्वारे टिपर मधली रेती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अमरावती प्रतिनिधी
सादिक शहा

कॅमेरामन
विक्की बाभुळकर

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें