अमरावती महानगरपालिका तिल शिक्षकांना लवकरच मिळणार सातवा वेतन आयोगाची थकबाकी- प्रतिनिधी विकी बाभुळकर ,जनता का रक्षक न्यूज अमरावती

0
17

मनपा शिक्षकांना लवकरच मिळणार सातवा आयोगाची थकबाक़ी

Dcps योजनेच्या हिशोब 2 महिन्यात मिळणार शिक्षकांना

सेवानिव्रुत्त शिक्षकांना सातवा आयोग लागू होण्याचे संकेत
अमरावती मनपा प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या बाबत नपा व मनपा शिक्षक संघ व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मध्ये नुकतीच चर्चा पार पडली. मनपा आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या सभेत शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर, मागणीवर सकारात्मक चर्चा झाली.
नपा व मनपा शिक्षक संघ व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी चर्चा करताना dcps योजनेचा हिशोब मिळावा याकरिता विशेष टीम तैयार करन्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी लेखाधिकारी यांना आदेश दिले असून जानेवारीच्या अखेरपर्यंत सर्व शिक्षकांना मागील 15 वर्षाच्या कपातिचा हिशोब मिळणार. तसेच योजनेत पारदर्शकता आनली जाणार असल्याचे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी संघटनेला अश्वासन दिले, तसेच सातवा आयोग ठकबाक़ी पहिला टप्पा दिवाळी आधी मिळावा अशी मागणी मांडली असता शासनाकड़ून आलेले 50 % अनुदान दिवाळी आधी देण्याबाबत अश्वसित केले व उर्वरित 50% मनपा हिस्सा नंतर मिळणार आहे, वरिष्ठ श्रेणीची प्रकरने तत्काल मार्गी लावणे याकरिता लवकरात लवकर वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे मार्गी लावण्यात येणार आहे. असे सांगितले, सोबतच सेवानिव्रुत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी प्राथमिक शिक्षकांना सातवा आयोग लागू झाला असला तरी सेवानिव्रुत्त शिक्षक मात्र अद्यापर्यंत प्रतिक्षेत असल्यामुळे त्यानांसुद्धा आयोग लागू करावा अशी मागणी केली असता याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यानी सांगितले, केन्द्रसमन्वयक पदी नियुक्ति करताना निश्चित धोरण असावे याबाबत मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिक्षण विभागाला यबाबतीत स्पष्ट धोरण तैयार करुण त्यानुसार नियुक्तया देण्याबाबत सूचित केले तसेच सर्व शाळांना शिपाई मिळावे यासाठी शाळा सुरु झाल्यानंतर याबाबत उचित निर्णय घेतला जाईल असे अश्वासन यावेळी संघटनेला देण्यात आले.
बैठकीला मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त सुरेश पाटिल, लेखाधिकारी हेमंत ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ अब्दुल राझिक, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, संघटनेचे अध्यक्ष योगेश पखाले, शाळा निरीक्षक उमेश गोदे, वहीद खान, गोपाल कांबले, मो.इमरान, शिक्षक ऐफाजउल्ला खान, नीलेश कवडे, सेवानिव्रुत्त शिक्षक नंदकिषोर करपेकर सह आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी विक्की बाभुळकर

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें