अमरावती सायबर पोलीस शाखेने 89 व्यक्तींचे मोबाईल केले मूळ मालकांना परत, सायबर पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक, प्रतिनिधी विक्की बाभुळकर= जनता का रक्षक न्यूज अमरावती

0
93

८९ मोबाईल मुळ मालकांना केले परत

किंमत ८ लाख ५० हजार रुपये

सायबर पोलिस स्टेशन अमरावती शहरची कामगिरी

शहरात मोबाईल मोबाईल गहाळ, चोरी झाल्याची घटना घडत आहेत. अशातच पोलीसही अशा चोरांचा शोध घेण्यास यश मिळवित आहे. शहर पोलिस आयुक्तालय येथे मोबाईल हरवल्याची तक्रार अनुषंगाने चौकशी करून मोबाईल प्राप्त करून ते मूळ मालकांना परत देण्याबाबत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी सायबर पोलिस स्टेशनचे अधिकारि व कर्मचारी यांना आदेशित केले होते.
मोबाईल हरवल्याची तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संबधित मोबाईल बाबत सखोल माहिती प्राप्त करून त्याचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करून 89 मोबाईल किंमत 8 लाख 50 हजार रुपये या मोबाईलचा शोध घेण्यास यश मिळविले. आज पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात हे सर्व मोबाईल मुळ मालकांना देण्यात आले. दिवाळी सणाच्या पूर्व संध्येला आपला हरवलेला मोबाईल प्राप्त झाल्याने उपस्थितांना अतिशय आनंद झाला असून सर्वांनी त्या बाबत पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग तसेच अमरावती शहर पोलिस दलाचे मनापासून आभार व्यक्त केले.
सदर कारवाई ही, पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशासन सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, जगदीश पाली, चैतन्य रोकडे, दिपक बदरके, शैलेंद्र अर्डक, गजानन पवार, सुधिर चार्जन, संजय धंदर, ताहेर अली, पंकज गाडे, सचिन भोयर, उल्लास टवलारे, प्रशांत मोहोळ, गोपाल सोळंके, मयुर बोरकर, गजानन दुबे आदी यांनी केली.
नागरिकांना पोलिस आयुक्तालयातर्फे सूचित करण्यात येते की, सायबर गुन्हेगार हे आपल्याला फोन करून बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डची माहिती, ओटीपी विचारून फसवणूक करतात. त्यामुळे कोणालाही आपल्या बँक खात्याची एटीएम, ओटीपी इत्यादी माहिती सांगू नका. तसेच काही सायबर गुन्हेगार हे तुमच्या मोबाईलमध्ये Any Disk, Team Vivewer, Quick Support, Airdroid ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगून त्यातून तुमच्या मोबाईलचा ताबा मिळवितात. व परस्पर बँक व्यवहार करून फसवणूक करतात. त्यामुळे आपले मोबाईलवर कोणाच्या सांगण्यावरून Any Disk, Team Vivewer, Quick Support, Airdroid हे अँप इंस्टॉल करू नका. सायबर गुन्हेगार हे ओएलएक्स, आर्मी, सीआयएसफ, एसआरपीएफ अशा सुरक्षा दलातील कर्मचारी असल्याची बतावणी करून मोबाईल, मोटर सायकल, कार, फर्निचर अशा वस्तूची खरेदी- विक्री करण्याच्या नावावर फसवणूक करीत आहे. तरी प्रत्यक्ष वस्तू पाहिल्याशिवाय व व्यक्तीला भेटल्याशिवाय ऑनलाईन व्यवहार करू नका. फोन पे, पेटीएम, गूगल पे वर केवायसी तसेच कशबॅकच्या नावावर फसवणुकीचे प्रकार घडत असून अनोळखी इसमाकडून कॉल करून केवायसी किंवा कशबॅकची बतावणी करून नोटिफिकेशन मध्ये जाऊन पे करण्यास सांगितले जाते व फसवणूक केली जाते. ज्यामुळे अशा अनोळखी मोबाईल कॉल्स पासून सावध राहावे. काही सायबर गुन्हेगारा कडून आपल्याला लॉटरी लागली आहे, कार जिंकली आहे, केबीसी मध्ये क्रमांक लागला आहे. असे सांगून विविध प्रोसेसच्या नावाखाली पैशाची मागणी करून फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा फोन कॉल्स व मेसेज वर विश्वास ठेऊ नये. वरील बाबत काही तक्रार असल्यास सायबर पोलिस स्टेशन अमरावती शहर आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा. असे नागरिकांना पोलिस आयुक्तालयातर्फे सूचित करण्यात आले.
प्रतिनिधी विक्की बाभुळकर

Bayer, who make Levitra, only sell their drug in a pharmacy once they are assured that it will not be sold without a prescription. buy viagra online malaysia It is illegal and hence dangerous to sell and obtain Levitra without a prescription.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें