खानजोड रेसिडेन्सी च्या प्रलंबित मागणीसाठी उपोषण सुरू= प्रतिनिधी फिरोज खान. उमेद कर्मचाऱ्यांना व महिला सख्यांना सेवेत कायम सामावून घ्या =प्रतिनिधी दिवाकर भोयर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा प्रकल्प माध्यमातून चांदूरबाजार जवळील गाव पसौंडा दत्तक घेण्यात आले=प्रतिनिधी फिरोज खान. शेगावचे कोविंड रुग्णालय निव्वळ देखावा= प्रतिनिधि शेखर नागपाल

0
108

खानजोड रेसिडेन्सीच्या नागरिकांचा उपोषण 21/09/2020 रोजी सुरु: अचलपुर उप विभागीय कार्यालय समोर अचलपूर फिरोज खान खानजोडे कॉलनी परातवाडा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर. मुख्याधिकारी, नगरपरिषद अचलपूर यांना विनंती करून ही कॉलनीमध्ये रहेनारे नागरिकांनी आजपासून अन्न त्याग चळवळ सुरू केली आहे, ज्यावर मुख्य कामांची प्रलंबित मागणी आहे की विकासकामांचा अभाव आणि रस्ता नाली पक्के रस्ते बांधणे यामुळे होत नाही. खानजोड रेसिडेन्सी मधील रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटींग विकासक किंवा प्रशासनाने केले पाहिजे. 2 सार्वजनिक मोकळ्या जागांवर आणि रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविली पाहिजेत आणि मोकळ्या जागांवर कुंपण घालून विकसित केले पाहिजे. 3 विक्री करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सोसायटीची स्थापना केली पाहिजे. 4 सर्व्हिज्ड अपार्टमेंटमध्ये अग्निशामक यंत्र बसवावेत. 5 सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये परिसरासाठी मोकळी जागा आणि पुरेशी पार्किंगची जागा आणि गेट उपलब्ध करुन दिले पाहिजेत. 6 विकसकाच्या उर्वरित शेतीच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकाम गोदामे आणि उत्पादनासाठी भाड्याने दिलेली गोदामे बंद करावीत. 7 पाणीपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी पाणीपुरवठा यंत्रणा पुरविली जावी. 8 विकासकाच्या उर्वरित शेती जमिनीवर अनधिकृत बांधकाम करण्यासाठी खानजोड रेसिडेन्सीच्या रोहित्र येथून 3 फेज वीजपुरवठा बंद करावा. 9. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण व विकास कामांना परवानगी मिळाल्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कारवाईचा प्रस्ताव द्यावा.
उपविभागीय अधिकारी अचलपूर जिल्हा अमरावती 21.09.2020 पासून. अश्यावबन यांनी आंदोलन सुरू करण्याचा संदर्भ दिला: – या सभागृहात 21.08.2020 आणि 15.09.2020 रोजी दिलेली विधाने ए.ई. वरील करारानुसार आम्ही सर्वजण खान जोड़ी रेसिडेन्सीच्या रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या घेत आहोत.
प्रतिनिधी फिरोज खान
जनता का रक्षक न्युज

्््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक न्युज धानोरा प्रतिनिधी 94216605230. * उमेद कर्मचाऱ्यांना व महिला सख्यांना सेवेत कायम सामावून घ्या * धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला आदिवासी व गरीब महिलांना जगण्याची दिशा दाखवण्यासाठी उमेद अभियानाची स्थापना करण्यात आली.उमेद अभियानाचा उद्देश समोर ठेवून च स्थापना झाल्यामुळे संपूर्ण देशात या अभियानाचा भरपूर प्रमाणात फायदा गरीब महिलांना झाला . ज्या महिलांनी अतिशय कमी शिक्षण घेवून ते घराबाहेर कधी निघत नव्हते. परंतु उमेद ने त्याच्या त बदल घडविला. सुरुवातीला महिला समूह समूह तयार करून बचत करायला लागल्या आणि तिथूनच कर्ज घेऊन लहान उद्योग जसे उदा.शेळीपालन ,मत्यपालन,मोहा खरेदी,धान खरेदी असे विविध व्यवसाय करायला लागल्या. असे अनेक प्रकारे उद्योग करायला सुरुवात केल्याने महिला मधे उमेद निर्माण झाली. कधी नव्हे ते बँक व्यवहार करायला शिकले, शिकविले पुरुषा पेक्षा महिला कमी नाहीत हेच उमेद ने दाखविले. पहिल्यादां‌ स्वताचे खाते बँकेत उघडले नंतर इतर महिलांचे काढण्यास भाग पाडले. ज्याचे बॅंकेत खाते नव्हते त्यांचे 100%खाते काढले. ह्या अभियानामुळे शेकडो महिलांचे नियमित व्यवहार सुरु झालेत. बँकेचे व्यवहार वाढलेत ,जमा पुंजी वाढली. महिला तरबेज झाल्यात आणि त्यांनी प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती योजना, सुरक्षा बिमा योजना व जनधन योजना च्या माध्यमातून अनेक महिलांनी लाभही घेतलेत . सुरुवातीला मुरुमगाव अतिदुर्गम आदिवासी परिसरात दारू विक्रीचे प्रमाण भरपूर वाढले होते . त्यामुळे अनेकाचे कुटूंब उद्वस्त झाले हि बाब लक्षात घेऊन महिला एकत्र येऊन गावात संपूर्ण दारूबंदी झाली आहे यांना तालुक्यातील कर्मचाऱ्यांची सुद्धा मार्गदर्शन केले. आज अनेक महिलांना रोजगाराची संधी या अभियानामुळे मिळाली आहे पण आज शासनाने ह्या अभियानाला च हरताळ फासून्याच्या तयारीत असताना . सरकारच्या विरोधात सभा घेऊन मुरुमगाव येथील महिला शक्ती, प्रभाग संघ व जनकल्याण ग्रामसभा महिलांनी शोषणाच्या विरोधात सहभाग घेतले आहे .यामध्ये जनकल्याण ग्राम संघ मुरुमगाव अध्यक्षा प्रभा मेश्राम, सचिव फगनीबाई भैसारे ,शैला कवाडकर , बॅंक सखि अर्चना देशमुख ,आय. सी .आर .पी.जयश्री चव्हाण, दीपा राऊत व सर्व संमुहातील सखी उपस्थित होते.

््््््््््््््््््््््््््््््््््

*देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तालुका चांदुर बाजार चे अध्यक्ष मुरली माकोड यांच्या नेतृत्व मध्ये सेवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले त्या अनुशागंने भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेल्स अध्यक्ष डॉ.शुभम राठी यांचा तर्फे माननीय नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा प्रकल्प माध्यमातून चांदूर बाजार जवळील गाव पर्सोड़ा या गावाला दत्तक घेन्यात आले.*
*या गावत राहनारे सर्व नागरिकांकरिता दुर्धर आजारावर होम्योपैथिक वीना मूल्य उपचार करण्याचे आश्वासन देन्यात आले. त्यानंतर परसोडा ग्राम मधील प्रत्येक नागरिकांना कल्पना होम्योपैथिक दवाखाना जयस्तंभ चौक चांदूर बाजार येथे ज्या व्यक्ति कडे आरोग्य कार्ड राहिल त्यांना आजिवन कल्पना होम्योपैथी दवाखान्यात मोफत उपचार देण्यात येइल.*
*ही घोषणा करित असताना भाजपा जिल्हाध्यक्ष सौ.निवेदिता ताई दीघदे, माजी मंत्री मा.आमदार.रणजीत दादा पाटील*
*मा.आमदार प्रताप दादा अड़सड व जिल्हा सरचिटणीस सुमित पवार जिल्हा सचिव बालासाहेब सोनार पदमाकर घोघरे* *भा.ज.यु.मो.ता.अध्यक्ष आशिष कोरडे,सुमित निभोरकर, न.प.बांधकाम सभापती आनंद उर्फ टिकु अहीर, विजय विलेकर, नंदकिशोर वासनकर, विलास तायवाडे, जयश्री पन्नगड़े, अभय माथणे, गोपाल तिरमारे तथा प्रतिष्ठित नागरिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते….*फिरोज खान जनता का रक्षक न्यूज़ अचलपुर

्््््््््््््््््््््््््््््््््््

शेगाव चे कोविद रुग्णालय निव्वळ देखावा
चार महिन्यापासून व्हेंटिलेटर आहे परंतु त्याचे जोळणी पार्ट नाही फक्त शोभेची वस्तू
शेगाव :-
शेगाव चे सईबाई मोटे उपजिल्हा शासकीय रुग्णालय ज्यामधे शासनाने मोठा गाजावाजा करून चार महिन्यापूर्वी कोविड १९ रुग्णांसाठी वेगळी कक्ष उभारणी करून कोरोना ग्रस्त रुग्ण करिता कोविद् रुग्णालयाला सुरवा त करण्यात आली होती ते कोरोना रुग्णालय आज चार महिन्यांनंतर ही सर्व सुविधा असतांनाही निव्वळ देखावा असल्याचे सत्य समोर आले आहे त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आरोग्य राज्यमंत्री ही आहेत त्यांनी बंद चा पाठीमागे न लागता या मूलभूत गरजांवर लक्ष दिले तर निश्चित च रुग्णांची फरफट न होता त्याला खर्या अर्थाने उपचार मिळणार व रुग्ण संख्या ही कमी होणार असे शेगाव संघर्ष समिति ने आरोप केले .
शेगाव शहरातील सईबाई मोटे रुग्णालय हे फार जुने रुग्णालय असून आधी ते स्त्री रुग्णालय म्हणून या पंचक्रोशीत नावाजलेले होते कारण त्या काळात स्त्री रुग्णालय हे फार कमी संख्येत होते कालांतराने ते जनरल रुग्णालय झाले नंतर काही वर्षाआधी या ठिकाणी शासनाकडून अत्याधुनिक इमारतीची उभारणी करण्यात येऊन या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालया चा दर्जा देण्यात आला मार्च महिन्यापासून देशात कोरोना चा संसर्ग वाढायला लागल्याने या रुग्णालयात शासनाने कोरोना ग्रस्त रुग्ण करिता ४० खटांचे कोवी द रुग्णालय सर्व सुविधायुक्त ची उभारणी केली व रुग्णाला आवश्यक असणारे १९ व्हेंटिलेटर ही दिले तसेच यामध्ये सेंट्रल आक्सिजन सिस्टीम ही लावण्यात आली तर या रुग्णालयात आधीच सी टी स्कान मशीन , सोनोग्राफी मशीन , एक्सरे मशीन हे असल्याने कोरोना तपासणी करण्याकरिता रपिड किट, व्ही टी एम किट व औषध साठा पुरविण्यात आला होता तरीही मागील काही दिवसांपासून शेगाव तालुक्यात v शहरात दररोज रुग्ण संख्या झ पट्याने वाढत असताना या रुग्णालयातून रेफर करण्याचे प्रमाण ही प्रचंड वाढले तर या रुग्णालयात उपचार मिळत नाही म्हणून ओरड ही वाढली आणि सामान्य माणसाला त्रास होत असतांनाही तो आर्थिक स्थिती नसतांनाही या रुग्णालयात उपचारासाठी जात नव्हता त्यामुळे त्याची अकोला शहरात , खामगाव शहरात कोरोना उपचाराचा नावाने लूट करण्यात येत आहे त्याकरिता या अत्याधुनिक रुग्णालयाची सत्य ता जाणून घेण्यासाठी शेगाव संघर्ष समिती ने शहरातील आरोग्य समिती सदस्य व गणमान्य नगरसेवक यांचेसोबत जाऊन पाहणी केली असता जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते कारण सईबाई मोटे हे रुग्णालय जरी शासकीय रेकॉर्डवर २०० खटांचे असले तरी याठिकाणी उपजिल्हा दर्जा मिळाल्यापासून फक्त १०० खटा देण्यात आलेल्या आहेत तर त्यामधून ४० खाट या कोविद कक्षा करिता दिल्याने आता रुग्णालयात इतर रुग्ण करिता ६० खाट उपलब्ध आहे तर या करोना कक्षकारिता पुरवठा करण्यात आलेल्या १९ व्हेंटिलेटर मशीन हे आल्यापासून तशाच पेटी पॅक आहेत कारण त्याला जोळणी करिता लागणारे जुजबी पार्ट उदा ups byatri , हेपि डीफायार , आक्सिजन कनेक्टर हे सोबत आलेले नाही मागील चार महिन्यात अनेकवेळा मागणी करूनही काहीच उपयोग नाही त्यामुळे जास्त त्रास रुग्णाला झाल्यास व्हेंटिलेटर अभावी त्याला अकोला रेफर करण्यात येते , शिवाय सी टी स्कान मशीन आहे परंतु त्याला चालविणारा तंत्रज्ञ नसल्याने ती मशीन धूळखात आहे , आलेला रुग्ण हो कोरोना रुग्ण आहे काय हे तपासणी करिता रॅपिड किट , व्ही टी एम किट नसल्याने त्याची ओळख होत नाही , सेंट्रल आकसिजन सिस्टम बंद पडले आहे त्याशिवाय रुग्णालया ला ६० आक्सिज न सिलेंडर ची गरज असताना रुग्णालयात आजरो जी फक्त १७ छोटे व ४ मोठे जंबो सिलेंडर आहेत त्यामुळे कधी रुग्णांचा नातेवाईकांना च अकोला येथून सिलेंडर भरून आणावे लागते ही वस्तुस्थिती आहे म्हणून रुग्णाला जास्त त्रास झाल्यास आम्हाला पर्याय राहत नाही असे Dr प्रशांत चव्हाण यांनी सांगितले वरील सर्व स्थिती पाहता जर पालकमंत्र्यांनी या मूलभूत सुविधा पुरविल्या तर निश्चित रुपात रुग्णांची आर्थिक लुबाडणूक ही नाही होणार व त्याला व नातेवाईकांना होणाऱ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही अन्यथा शेगाव संघर्ष समिती याचा पाठपुरावा करून रुग्णांना न्याय मिळून देणार . या रुग्णालयात भेट देणाऱ्या समिति मध्ये शेगाव संघर्ष समिति चे शेखर नागपाल , विजय मिश्रा , आरोग्य समिति सदस्य प्रमोद काठोळे , नगरसेवक के टी चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते टी एस कलोरे , माजी नगरसेवक राजू भाऊ चुलेट हे होते . यावेळी रुग्णालयाचे Dr प्रवीण सांगळे ,औषध प्रमुख मानकर हे उपस्थित होते

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें