गडचिरोली:कोरोनाग्रस्तांसाठी 51 हजारांची मदत

0
24

कोरोनाग्रस्तांसाठी 51 हजारांची मदत

प्रा,संतोष सुरपाम

जिल्हा प्रतिनिधी
जनता का रक्षक न्युज गडचिरोली

गडचिरोली, दि.29: ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन (AIAEF), गडचिरोली यांच्यावतीने कोरोना बाधित लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रुपये 51 हजार, उपजिल्हाधिकारी(रोहयो) धनाजी पाटील यांच्याकडे जमा केले. यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे (AIAEF), अध्यक्ष भरत येरमे, कार्याध्यक्ष -माधवराव गावळ, सरचिटणीस सदानंद ताराम,कोषाध्यक्ष आनंद कंगाले, तालुका अध्यक्ष,गडचिरोली अमरसिंह गेडाम, अध्यक्ष गो.गो.ब समिती गडचिरोली सुरेश किरंगे उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन (AIAEF), गडचिरोली मधील पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपाध्यक्ष श्रीमती सुनिता मरस्कोल्हे, प्रा. रमेश हलामी, सहसचिव वसंत पेंदराम, लालाजी उसेंडी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. पितांबर कोडापे, जिल्हा संघटक लोकचंद बाळापूरे, कार्यकारिणी सदस्य वनिश्याम येरमे, शालिक उसेंडी, वासुदेव कोडापे, भास्कर आत्राम, दिनकर नरोटे, अनिल उईके, यशोधरा उसेंडी, वसंत पोरेटी, वत्सला नरोटे, सल्लागार गुलाबराव मडावी, फरेंद्र कुत्तीरकर, लक्ष्मणराव कोवे, रामचंद्र गोटा यांचा समावेश आहे. यावेळी प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी(रोहयो), धनाजी पाटील यांनी यावेळी त्यांचे आभार मानले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें