गडचिरोली जिल्हा= धानोरा येथे शिव भोजन थाळी चा शुभारंभ. ०२- गेवर्धा गावाजवळ मिनी मॅटडोअर पलटली 19 महिला मजूर जखमी आठ गंभीर. ०३- सावित्रीबाई कन्या व क्रांतिज्योति बचत योजनेचा शुभारंभ, फुले दांपत्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरा यांच्याकडून. ०४- राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत रोशन सहारे यांचे सुयश. ०५- शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा , सभापती सौ अनुसया ताई कोरेटी. *प्रतिनिधी दिवाकर भोइर जनता का रक्षक न्यूज धानोरा*

0
17

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 धानोरा येथे,शिवभोजन थाळीचा शुभांरभ.

धानोरा तालुक्याचे ठिकाण असुन येथे 50ते60 किलोमीटर अंतरावरुण दररोज शेकडो लोक उपाशी कार्यालयीन कामा करिता सकाळीच येतात अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखिची आहे.अशा लोकांची गरज लक्षात घेवुन येथे शिवभोजन थाळिचे श्री. मा. शेखरभाऊ उईके शिवसेना तालुका प्रमुख यांचे अध्यक्षतेखाली मा.गणवीर तहसीलदार धानोरा यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळि,प्रमुख पाहुणे लीनाताई साळवे नगराध्यक्षा नगरपंचायत धानोरा, नायब तहसिलदार भगत ,मुकेशभाऊ बोडगेवार शिवसेना शहरप्रमुख धानोरा, सुभाषभाऊ धाईत,समीरभाऊ कुरेशी, घनश्यामभाऊ मशाखेत्री, सुरेशभाऊ क्षीरसागर,पुरूषोत्तम चिंचोळकर आदि मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते .
््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 गेवर्धा गावाजवळ मिनीमेटाडोर पलटली, १९ महिला मजूर जखमी, ८ गंभीर.

धान रोवणीसाठी महिला मजुरांना घेऊन जाणारा मिनी मेटाडोर पालटून झालेल्या अपघातात १९ महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास वडसा ( देसाईगज )कुरखेडा मार्गावरिल गेवर्धा गावानजीक घडली यामध्ये आठ मजूर गंभीर जखमी असल्याने त्यांना कुरखेडा येथिल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले आहे
जखमीमध्ये शामिना मलगाम ३८,रोहिणी धुर्वे २८,वैशाली धुर्वे ३२,शीतल पुराम २१,मीनाक्षी कुलमेथे३१,संगीताधुर्वे ४३,कमल करपते५३,उत्तरा पंधरे५०,सायत्रा नेवारे५५,प्रियंका मलगाम ३७,पुजा धुर्वे२१,जागृती मलगाम १८,कल्पना पुराम३७,प्रतिभा नेवारे ३०,निखिता मलगाम३५, अर्चना मलगाम३२,प्रतिभा करपते २८,विमल करपते ४०,भारती मलगाम४१ यांचा समावेश आहे
सर्व मजूर (देसाईगज) वडसा तालुक्यातील डोगरमेंढा येथिल रहिवासी आहेत
सर्व मजूर रोवना रोवन्या करिता डोंगरमेंढा येथून एका मिनि मेटाडोरने कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथे धान रोवणीच्या कामासाठी जात होते दरम्यान गेवर्धा गावाजवळ वाहनचालकाचे संतुलन बिघडल्याने वाहन पालटल्याने हा अपघात झाला.अपघाताचे वृत्त समजताच भाजपचे तालुकाध्यक्ष नाजुक पाटील पुराम,माजी तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली
््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

*दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी साविञीमाई कन्या व क्रांतीजोती बचत योजनेचे शुभारंभ*
फुले दाम्पत्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या., धानोरा कडून साविञीमाई कन्या योजना व कांतीजोती बचत योजनेचे शुभारंभ मा. मुकाजी भेंडारे तालुकाध्यक्ष,तालुका माळी समाज धानोरा यांच्या हस्ते संस्थेचे कार्यालय धानोरा येथे करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वामनजी वाडगुरे, उपाध्यक्ष खुशालचंद गेडाम, चंदुभाऊ कुनघाडकर, पुरुषोत्तम लेनगुरे, पार्वती पदा, अल्का सहारे, दौलत चौधरी, मनिषा निकोडे, ज्योती जेंगठे, सुखदेव चौधरी, मुखरु मांदाळे, भास्कर सोनुले, राजु मोहुर्ले, रत्नाकर नारनवरे, किशोर मांदाळे, वैशाली शिडाम, दर्शना निकेसर आदि उपस्थित होते.

््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 राज्यस्तरीय बुध्दीबळ पंच परिक्षेत रोशन सहारे यांचे सुयश *************************ऑल मराठी चेस असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे दिनांक २७ व २८ जून २०२० रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत धानोरा येथील श्री रोशन सहारे हे उत्तीर्ण झालेय आहेत. याद्वारे महाराष्ट्र राज्यात घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

सदर परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होती. परीक्षेचे परीक्षक आंतरराष्ट्रीय पंच श्री मान. नितीन शेनवी हे होते तर याप्रसंगी आयोजित चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय पंच श्री मान.अनुराग सिंग यांनी बुद्धिबळातील नवीन नियमांबाबत मार्गदर्शन केले.

श्री रोशन सहारे हे मूळचे धानोरा येथील रहिवासी असून गडचिरोली येथे रोशन सर चेस अकादमीचे ते संस्थापक संचालक आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई वडील विभा व नामदेव सहारे तसेच धानोऱ्यातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. बर्वे आणि नगरसेवक सुभाशभाऊ धाईत यांना दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर -जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा. सभापती कोरेटी***********************
शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा. व विषमुक्त अन्न तयार करावा शेतीकडे आपला व्यवसाय समजून पाहण्याची गरज आहे. तसेच शेती पूरक व्यवसायावर भर देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी. असे प्रतिपादन पंचायत समिती धानोरा चे सभापती सौ.अनुसया, ताई कोरेटी यांनी केले. हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजा हेटी येथे कृषी दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. तालुक्यातील मौजा हेटी येथे कृषी विभाग पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोरा यांच्यावतीने कृषी दिनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कृषी संजीवनी सप्ताहाचे येथून सुरुवात करण्यात आली. या सप्ताहामध्ये तालुक्यातील 84 गावांमध्ये शेतकर्‍यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतीच्या मशागती पासून तर यांच्या विक्री व्यवस्थापना पर्यंतच्या सर्व विषयावर कृषी विभागाचे कर्मचारी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांच्या मदतीने शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. असे तालुका कृषी अधिकारी आनंदपाल यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये सांगितले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती , उपसभापती विलास गावडे, सरपंच रवींद्र उसेंडी, तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, मंडळ कृषी अधिकारी एल एस पाठक, कृषी अधिकारी शिवाजीराव खटके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंती टेंभुर्णे, कृषी पर्यवेक्षक नीलकंठ बडवाईक, येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेडाम, पंचायत समिती धानोराचे कृषी विस्तार अधिकारी पदा, लेखा विस्तार अधिकारी घुघुसकर हे होते. तर प्रगतिशील शेतकरी माजी विस्तार अधिकारी सावसाकडे यांनी सेंद्रिय शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये गावातील शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक सुचीता येरमे, कृषी सहाय्यक विकेश मडावी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ग्रामपंचायत परिसरामध्ये वृक्षारोपण तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर गादीवाफ्यावर रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी एल एस पाठक यांनी तर सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे यांनी केले

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें