गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे सीआरपीएफ जवानांनी केले वृक्षारोपण,. ०२- धानोरा येथील श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती द्वारे नाभिक समाज व व्यवसायिकांना धंदा सुरू करण्याची परवानगी द्या, तहसीलदार यांना निवेदन. ०३- धानोरा येथील रांगी परिसरात पंधरा दिवसांपासून लाइनचा अप-डाऊन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,. ०४- पेंढरी रांगी परिसरातील मका पिकासाठी गोदामाची पर्यायी व्यवस्था करा. प्रतिनिधी दिवाकर भोयर

0
44

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी ९४२१६६०५२३ ‌. धानोरा येथे सि.आर.पी.एफ जवानांनी केले वृक्षारोपण…………. धानोरा येथील ११३बटालियन जवानांनी कमांन्डैन्ट श्री.जी.डी.पंढरीनाथ यांच्या हस्ते झाड लावून वृक्षारोपणाला सुरवात करण्यात आले.धानोरा गडचिरोली रोड च्या बाजूला , शाळेत, आणि बसस्टँड परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावन्यात आले.कारण या परिसरात झाडाचा हिरवेगार पणा कायम टिकून राहावा.भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होउ नये.जीवनात झाडाला खुप महत्व आहे.झाडे आपल्या ला सावली देतात,फळ,फुल, आणि आक्सिजन पुरवतात.त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत असे विचार श्री. पंढरीनाथ यांनी मांडले. विविध प्रकारच्या वृक्षा मधे नीबांचे ,जाभंळाचे सिसम,करंजी,आवळा या जाती ची झाडे लावन्यात आली.तसेच येथिल जवानांनी येरकड,मुरुमगाव,सावरगाव,ग्यारापत्ती,गोडलवाही या गावात सुद्धा वृक्षाची रोपे ला्वन्यात आले.त्यामुळे ११३बटालियन चे जवान अभिनंदनास पात्र आहेत. .वृक्ष लागवडीसाठी बटालियनचे सर्व जवान उपस्थित होते.

््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी 9421660523 धानोरा तालूक्यातिल नाभिक समाज व व्यवसायीकानां धंदा सुरुकरण्याची परवानगी द्या.              महाराष्ट्र सरकारने  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखन्याकरिता लाँकडावून घोषित केला.घोषित केल्या  पासून सलून व्यवसाय बंद असल्याला  चार महिने पुर्ण झालेत. धंदाच बंद असल्याने सर्वच दुकानदाराना व कारागीराना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने तालुक्यातिल सलून व्यवसायिकाना दुकान उघडन्याची परवानगी देन्याची मागनी श्री.संत नगाजी महाराज समाज सेवा समिति धानोरा यांनी केली आहे.                                                                     धानोरा परिसर अतिदुर्गम असून लोकांच्या  हाताला काम मिळने दुरच आहे.अशातच या भागात नाभिक समाजाचे अनेक गावी छोटे छोटे सलुनचे दुकान आहेत,ज्याच्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो माञ तेच दुकान चार महिन्या पासुन बंद असल्याने आर्थिक चणचण भासत आहे. कुटूंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.                                                          दारिद्रयात जीवन जगणाऱ्या  या समाजात हातावर आणून पानावर खाणारा या प्रकारात मोडत सलून चालू करन्याचे कोनतेही संकेत शासन देत नसल्याने  या व्यवसायीकांची मानसिक व आरोग्य ढासळत चालले आहे.                                                          चार महिन्या पासून ठप्प आसलेला व्यवसाय चालू करन्याची परवानगी द्यावी.अन्यथा  तालुक्यातिल नाभिक समाज ,व्यवसाइक ,कारागीर यांचे  सर्वेक्षण करुण आर्थिक व जिवनावश्यक वस्तूची मदत करन्याची मागणी तालुक्यातिल श्री.संत नगाजी महाराज ,सामाजिक सेवा समिती धानोरा यांनी  मा.तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून श्री.ज्ञानेश्वर वनस्कर अध्यक्ष ,जगदिश सुर्यवंशी उपाध्यक्ष,सुरज सुर्यवंशी सचिव ,मनोज मेसरकर,दिलिप कौशिक,महेश चौधरी ,सचिन पोहनकार ,भुषण लक्षणे, समितीचे इतर सदस्य यांनी दिलेल्या निवेदनातून केलि आहे.

््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी. ९४२१६६०५२३ रांगी परिसरात पंधरा दिवसा पासून लाईनचा अपडावून……. अधिकार्याचे दुर्लक्ष—— धानोरा तालुक्यातील रांगी परिसरात मागील पंधरा दिवसांपासून विद्यूत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा नाहक त्रास परिसरातील लोकांना सोसावा लागत असल्याने येथिल विद्यूत पुरवठा नियमित करण्याची मागणी लोकांनी केली आहे. धानोरा तालुक्यातील रांगी परिसरात ,मोहली,बोरी,निमनवाडा,धुसानटोला,मासरगाटा, खेळी,कन्हाळगाव,चिगंली,महावाडा ,ताडामटोला असेअनेक छोटे,मोठे गाव जोडलेले आहे . लाईनमॅनच्या म्हणण्यानुसार त्या गावामध्ये कुठे कुठे काय फाल्ट आहे काय गेल ,कोणते सामान बदलावे लागते याची माहिती लाईनमॅन यानी लेखि मध्ये वरीष्ठ अधिकारी यांना दिले असल्याचे कळते .परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व कामे आटोपने आवश्यक असतांनाही वरीष्ठ अभियंता यानी लक्ष दिले नाही.त्यामुळे रांगी परिसरात वांरवार होनार्या विद्युत खंडित चा सामना करावा लागतो याला अधिकार्याचे अलगर्जीपणा म्हणायचे का? निष्काळजीपना ! हे लोकांना कळले नाही.तसेच महाराष्ट्र वीज वितरण कंपनी पंधरा दिवसांपासून याबद्दलअभिज्ञ असल्या सारखे वागत असुन संपूर्ण तालुक्यालाहि विद्यूत समस्या भेडसावतर असुन येथील संबधित विभागाचा भोंगळ कारभार दिसून येतो.,

अवेळी होणा—या खंडित विजे मुळे परिसरातील अनेक लोकांना ,आजारी रूग्णाना ,कार्यालयाना,आ‌ॅनलाइन कामांना, इलेक्ट्रॉनिक , दुकानाना राईसमील व आटाचक्कि मालकाला मागिल पंधरा दिवसांपासून नाहक त्रास सोसावा लागत आहे.
विज वितरण कंपनी च्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण तालुका अप डाऊन मुळे कधी प्रकाश तर कधी अंधारात रात्र काढवे लागते. ,दूरवरून असलेली जनतेला बॅंक व्यवहार न करताच आल्या पायी वापस जावे लागते.,सर्व जमाना डिजिटल असल्या कारणाने धानोरा मुख्यालयी आल्या शिवाय पर्याय नसतो,मात्र या विभागाला संबधित जनतेबाबत काहिच सोयर सुतक नाई , येथील भोंगळ कारभारा कडे वरिष्ठ अधिकारी जातिन लक्ष देतील का,? असा प्रश्न सर्व तालुक्यातील समस्याग्रस्त जनतेला पडला आहे.

््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी ९४२१६६०५२३पेंढरी परिसरातील मक्का पिकासाठी गोदामाची  पर्यायी व्यवस्था करा*****जनतेची मागणी .             धानोरा तालुका अंतर्गत पेंढरी परिसरात सन 2019-20या वर्षात शेतकर्यानी मोठ्या प्रमाणात  मक्का पिकाची लागवड करून पिकाचे उत्पन्न भरपुर झाले आहे.या परिसरातील  मक्का उत्पादकानी धानोरा येथिल विक्रि केन्द्रावर आँनलाईन विक्री करिता नोदणी केली पण प्रत्यक्षात शेतकर्याचे मक्का पिकाचि मोजणी (वजन)केली नाही .त्यामुळे शेतकऱ्याने  स्वताच्या शेतातच पिकाची साठवन करुण ठेवलेली आहे.त्यामुळे   मका खराब होवुनये व शेतकर्याची नुकसान  रोखन्या करिता गोदाम   उपलब्ध  करुण देन्याची मागणी  पेंढरी परिसराती लोकांनी केलि आहे.                                                                     मे २०२० महिन्यात आधारभूत किमतीत धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाने संपुर्ण तालुक्यातील मक्का उत्पादक शेतकऱ्यांना करिता खरेदी केंद्र सुरु केले.मात्र पेढंरी परिसरातील लोकांनी मक्का पिक खरेदी बाबत विचारना केली असता धानोरा येथील गोडावून शेतमालाने भरले असल्याने मक्का खरेदी करण्यास अडचण निर्माण होत असल्याने सदर विक्री केंद्र बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले                 त्यामुळे पेंढरी क्षेत्रातील बळीराजानी पेंढरी येथील गोटूल भवनात अंदाजे ५ते७हजार टन मक्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने व्यवस्था केलेली आहे.म्हणून पेंढरी येथेच मक्का खरेदी केंद्र सुरु करण्या संबंधाने आपल्या स्तरावरुन संबंधित यंत्रणेला सुचना देण्यात यावे.                                                   सध्या पावसाळ्याचे दिवस असुन नियमित पाउस पडत आहे.वरुण पडलेल्या पावसाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसून पावसामुळे हाती आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागनार .हे नुकसान टाळण्यासाठी , या भागातील शेतकऱ्यांनी गोदामांची व्यवस्था केली असल्याने येथील मक्का पिकांची उचल करण्यास संबंधित यंत्रणेला, विभागाला आदेश देण्यात यावे.आर्थिक संकटातून बळीराजा ला बाहेर काढण्यासाठी आपण आदेशित करून पिकांची लवकरात लवकर उचल करण्याची मागणी या भागातील शेतकरी रामेश्वरी नरोटे, रामभाऊ नाईक, बाजीराव पोटावी, अविनाश पवार, सिताराम कुसराम,अजय देहाटी, बाबुराव तुलावी, मधुकर झाडे,हरीदास गावडे यांच्या सह सोळा लोकांनी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन केली आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें