गडचिरोली पोलीस दलाने वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

0
170


गडचिरोली पोलीस दलाने वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

वीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही-मा.पोलीस अधिक्षक श्री.शैलेश बलकवडे

प्रा,संतोष सुरपाम

जनता का रक्षक न्युज गडचिरोली
9420512851

गडचिरोली :येथील दिनांक १ मे २०१९ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळखेडा नजिक नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले होते.या निमित्ताने आज गडचिरोली पोलीस दलाने या वीर बहादूर जवानांचे स्मरण करत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी लढ्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना मा.पोलीस अधीक्षक श्री.शैलेश बलकवडे, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मोहितकुमार गर्ग,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अजयकुमार बन्सल,मा.सहायक पोलीस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भाऊसाहेब ढोले सो यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहीली.यावेळी मोजकेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मा.पोलीस अधिक्षक श्री.शैलेश बलकवडे सो यांनी नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करत गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी मोहीम यशस्वीपणे पार पाडत नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यात व त्यांना नामोहरम करण्यात यश प्राप्त केल्याचे सांगितले.त्याचबरोबर गडचिरोली पोलीस दलाच्या शहीद बहादूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता या जिल्ह्यातून नक्षलवादाला हद्दपार करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचे म्हंटले.यानंतर मा.पोलीस अधीक्षक, श्री.शैलेश बलकवडे सो व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्सल सो यांनी शहीद जवानांच्या घरी जाऊन जवानांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.गडचिरोली नजिक मौजा चुरमुरा येथे राहणारे शहीद वीर जवान किशोर बोबाटे यांचे कुटुंबियांनी व गावातील तरुण मंडळींनी एकत्र येत शहीद वीर जवान किशोर बोबाटे यांचे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.याठिकाणी मा.पोलीस अधिक्षक श्री.शैलेश बलकवडे सो यांनी भेट देत या जवानांच्या कुटुंबियांचे व गावातील तरुणांचे कौतुक केले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें