ग्रामीण व शहरी भागात तपासणीसाठी आशा वर्कर झाल्या डॉक्टर ,आशा स्वयंसेविका जाणार बेमुदत संपावर, माझे गाव माझे कुटुंब सर्वेक्षणाच्या वाजणार तीन तेरा. = प्रतिनिधी नितीन दुरबुडे -जनता का रक्षक न्यूज

0
43

ग्रामीण व शहरी भागात तपासणीसाठी
आशा वर्कर झाल्या डॉक्टर .
आज पासुन आशा स्वंयसेविका जाणार बेमुदत संपावर. माझे गाव-माझे कुटुंब सर्व्हेक्षणाचे वाजनार तीन तेरा
आज आपल्या देशात नाही तर पूर्ण जगभर कोरोणा महामारी चे संकट असल्याने त्याच्या समोर नागरिक हतबल झाले असून त्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्नशील आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी माझं कुटुंब माझं घर सर्व्हेक्षण कार्यक्रम चालू केला त्या कार्यक्रमांतर्गत गावातील अशा स्वंयसेविका व काही स्वयंसेवी नागरिक त्यांच्यासोबत राहून ऑक्श मिटरने नागरिक चे त्यांचे पल्स पाहून आपल्या नोंदवहीमध्ये नोंद घेत असून त्यास खिळ बसण्याची शक्यता निर्माण झाली. आशा स्वंयसेविका घरोघरी जाऊन काम करीत आहे.एवढेच नाही तर त्यांनी त्यानी कोरोणा काळात प्रशासनाने त्यांना आदेश दिल्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसाला तपासणी करून आपले अहवाल आरोग्य विभागाकडे पाठविले. आज ग्रामीण भागात कोरणा बाधीतांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असून शहरासह गामीण भागात विळखा घालत आहे. आरोग्य विभाग ढिसाळ दिसत आहे कारण एखादा रुग्ण कोरोणा बाधीत झाला तर त्याला कोविड सेंटरला २ दिवस रुग्ण वाहिका नेण्यासाठी येत नाही. त्यानंतर त्या घरातील सदस्यांच्या तपासणी करीता आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा येत नाहीत असे आढळुन आले. आपत्तीव्यवस्थापन समीतीतील सदस्य तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक ढुंकुणही पाहत नाही,सर्वस्वी जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याचे सांगतात. निव्वळ कोरोणायोद्धे म्हणुन आरत्या ओवाळण्यात धन्यता मानत असल्याचे दिसुन येते.
आशा स्वंयसेविका ह्या जीवावर जोखीम घेऊन आपले कर्तव्य पार पाडीत आहे .
आणि आरोग्य विभागासह प्रशासन मात्र उंटावरून शेळ्या हाकत आहे अशी गावातील चर्चा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. (आरोग्य विभागाचे कर्मचारी पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी साधी भेट सुद्धा देत नाहीत. असे निदर्शनात येत आहे आणि आशा यांना कुठल्या प्रकारचे संरक्षण नाही
त्यासाठी त्यांना जास्त मोबदला सुद्धा शासनाने जाहीर केला परंतु मिळाला नाही म्हणून अमरावती, यवतमाळ, वर्धासह विदर्भातील आशा स्वंयसेविका यानी दिनांक २१ सप्टेंबर ला बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आय टेक जि. सचिव प्रफुल देशमुख यांनी सांगितले.)
(महेश खारोडे. उपसभापती अंजनगाव सुर्जी पंचायत समिती
यांच्या मते शिक्षकांच्या त्यांच्या शाळा बंद असल्याने आशा सोबत कामे करावे तसेच ग्रामसेवक मुख्यालय हजर राहत नसेल तर त्यांचे मुख्यालयाचा घरभाडे भत्ता घेत असेल तो कमी करावा. आशा काम करत आहेत त्यांना शासनाने मानधन वाढवून द्यावे ग्रामीण भागातील व शहरी भागातील आशा वर्कर डॉक्टर सारखी कामे करत आहेत.)
प्रतिनिधी नितीन दुरबुडे
जनता का रक्षक न्यूज

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें