जनता का रक्षक न्यूज चैनल तर्फे अमरावती येथील बडनेरा पोलीस स्टेशन,, राजापेठ पोलीस स्टेशन ,,खोलापुरी स्टेशन येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. *जनता का रक्षक न्यूज*

0
321

जनता का रक्षक न्यूज चॅनलतर्फे सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना संम्मानपञ देऊन सत्कार

बडनेरा, राजापेठ, खोलापुरी गेट पोलिस स्टेशन यांचा समावेश

विक्की बाभुळकर
अमरावती प्रतिनिधी :
सद्या कोरोना विषाणूमुळे सार जग अंधकारमध्ये गेले आहे. सर्वञ लाॅकडाऊन करण्यात आले असून काही सुटसुद्धा देण्यात आली आहे. कोरोना ही बिमारी जास्त पसरू नये म्हणून लाॅकडाऊन करण्यात आले आहे. यात पोलिस अधिकारी, कर्मचारीसुद्धा ही कोरोना बिमारी आपल्या शहरात पसरू नये म्हणून राञ दिवस आपले भुमिका, योगदान देत आहेत.
कोरोना विषाणूमूळे अनेक नागरिकांना याची लागण झाली असून काही मरण पावले आहे तर अनेक नागरिक बरेसुद्धा झाले आहेत. अशातच डाॅक्टर, नर्सेस, साफसफाई कर्मचारीसुद्धा आपले योगदान देत आहेत. अशातच पोलिस अधिकारी, कर्मचारीसुद्धा या कोरोना महामारीत राञ-दिवस आपले योगदान देत आहेत. कोरोना महामारीत आपले योगदान, भूमिका बजावित असतांना अनेक पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तरीसुद्धा ते आपली जिवाची पर्वा न करता आपली भूमिका बजावत आहे, योगदान देत आहेत.
अशातच बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी आणि कर्मचारी, राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर सुर्यवंशी आणि कर्मचारी, खोलापुरीचे पोलीस निरीक्षक अतुल घारपडे आणि कर्मचारीसुद्धा रात्र-दिवस आपली जिवाची पर्वा न करता आपले योगदान देत आहेत. त्यांच्या या महान कामगीरीबद्दल जनता का रक्षक न्यूज चॅनल तर्फे सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना संम्मानपञ, पुष्‍पगुच्‍छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जनता का रक्षक न्यूज चॅनलचे संपादक अनिता चवरे, उपसंपादक पांडूरंग करमाले, कार्यकारी संपादक सादिक शहा, साबीर शहा, हरिष हजारे, फदरूर रहमान, साबिर हुसेन, विक्की बाभुळकर आदी जनता का रक्षक न्यूज चे प्रतिनिधी उपस्थित होते.


कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें