जितेंद्रनाथ महाराजांना आयोध्या चे निमंत्रण. धारणीत कोरोना बाधित रुग्ण ३३. कावळाझिरी धबधब्यावर आंघोळ करण्याकरीता वनकर्मचारी वसूल करत आहेत मोबदला. गांधी आश्रम येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

0
47

जितेंद्रनाथ महाराजांना अयोध्येचे निमंत्रण
दिनांक :31-Jul-2020

-पवित्र मृत्तिका व जल भूमिपूजनाला नेणार

jitendrnath maharaj_1&nbs
नागपूर,
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर मंदिर निर्माणकार्यातील भूमिपूजन समारोहासाठी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासातर्फे प्रधानमंत्री कार्यालयातून जारी निमंत्रणानुसार महाराष्ट्रातून श्रीदेवनाथ मठ, अंजनगाव सुर्जीचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज हे अयोध्येकडे रवाना होत आहेत.

यामुळे विदर्भ -महाराष्ट्रात समस्त रामभक्त हिंदू समाजात आनंदाची लहर उसळली आहे. श्रीनाथ पीठ, श्री देवनाथ मठ हे भारतातील एक प्रमुख आध्यात्मिक आचार्य पीठ म्हणून ओळखले जाते. सुमारे ६०० वर्षांंपासून प्राचीन श्रीनाथ पीठाचे स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज हे अठरावे पीठाधीश असून अनेक शतकांपासून श्रीरामजन्मभूमी आंदोलनात या पीठाची सक्रिय भूमिका राहिली आहे.

एकोणविसाव्या शतकात स्वामी गोविंदनाथ यांनी प्रयागराजहून संघर्ष केला. ब्रम्हलीन मनोहरनाथ महाराजांनी श्रीराम मंदिरांसाठी नित्य संघर्ष केला. याच गुरुपरंपरेचे निर्वहन करीत आचार्य जितेंद्रनाथ महाराजांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात महत्त्वपूर्ण व निर्णायक भूमिका बजावली. ते विश्व हिंदू परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य, केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि धर्मजागरण मंचाचे केंद्रीय मार्गदर्शक आहेत. त्यांनी देशभर प्रवास करून विभिन्न राज्यात हुंकार सभेने हिंदू समाजात चैतन्य आणले.

पंतप्रधानाच्या हस्ते व समस्त संतांच्या पावन उपस्थितीतील या ऐतिहासिक सोहोळ्यासाठी जितेंद्रनाथ महाराजांना सम्मानपूर्वक निमंत्रण आल्याने विदर्भाला मानाचे स्थान प्राप्त झाल्याची चर्चा आहे. त्यांना भेटण्याचा रामभक्तांचा ओघ वाढला असून, किल्ले शिवनेरी, विदर्भातील प्रमुख धार्मिक स्थाने, त्र्यंबकेश्वर येथील महाकुंभस्थानाचे गंगा – गोदावरी तीर्थ आदी अनेक स्थानांची मृत्तिका तसेच तीर्थ त्यांना सोपविण्यात येत आहे. नितीन दुरबुडे रिपोर्ट

्््््््््््््््््््््््््््््््््््

अमरावती न्यूज प्रतिनिधी हरीश हजारे

**गांधी आश्रम येथे साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली **

जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त गांधी आश्रम येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली !!
त्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य #रविजी_खांडेकर साहेब यांच्या शुभहस्ते माल्या अर्पण करण्यात आले तसेच खोलापुरी गेट पुलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक #अतुलजी_घारपांडे साहेब यांनी सुद्धा अभिवादन केले व
त्या प्रसंगी सन्माननीय अतिथी या अभिवादन सोहळ्यात उपस्थित म्हणून अंबा मंडल अध्यक्ष #राजेशभैया_गोयंका जी , महामंत्री अंबा मंडल #अतुलभाऊ_तिरथकर, महामंत्री अंबा मंडल,#तुषारजी_वानखडे, माजी. नगर सेविका व भाजपा महिला नेतृत्व #सौ_गांगताई_खारकर, प्रभाग क्र,१३ चे नगर सेविका #सौस्वातीताई_शेखरजी_कुलकर्णी , आमच्या प्रभाचे नगर सेवक #आशिषदादा_अतकरे , मनपा शहर सुधार समिती अध्यक्ष #अजयभाऊ_सारसकर भाजपा वरिष्ठ आमचे मार्गदर्शक, मा.#सुरेंद्रजी_बुरंगे व एकवीरा देवी संस्थानाचे सचिव तथा आमचे मार्गदर्शक भाजपा वरिष्ठ पदाधिकारी मा. श्री.#शेखरजी_कुलकर्णी , मनपा, झोन क्र, २ चे वरिष्ठ पदाधिकारी आमचे मार्गदर्शक #गजुभाऊ_हर्षे, मा. श्री.#पवनदादा_अकोटकर,अमरावती शहरातील युवा नेते नगर सेवक #प्रणितदादा_सोनी, #कुणालदादा_सोनी, माझे मित्र शिवसेना युवा नेते #पवनअरुणराव_दळवी आणि माझे सहयोगी मित्र #सागर_संजयराव_लोखंडे व सर्व सहकारी गांधी आश्रम मित्र परिवार

्््््््््््््््््््््््््््््््््््
धारणी कोरोणाचा उद्रेक एकाच दिवशी
धारणी शहरातील 4 खाजगी डॉक्टर, आणि कुसुमकोट बु, कलमखार येथील प्रत्येकी 1 डॉक्टर अशे एकूण 6 डॉक्टर सह धारणीतील काँग्रेस चे एक जिल्हा पदाधिकारी आणि शहरातील प्रतिष्टित नागरिक अशे एकूण 33 कोरोना बाधीत रुग्ण धारणीत आढळल्याने मेळघाटसह धारणीत खळबळ माजली
33 रूग्ण आढळल्याची बातमीला धारणी तालुका वैधकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.
आज आलेल्या बाधीतांचे २९ जुलै ला मुलींच्या वस्तीगृृृहात थ्राट स्वॅब घेतले होते.आज सर्व कोरोणा बाधीताना मुलींच्या वस्तीगृृृृृहातच संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. खाजगी दवाखान्यात गेल्या दोन महीण्यापासुन उपचार घेतलेल्या रुग्णांचा शोध घेतल्या जात आहे. धारणीशहर कुसूमकोट, कळमखार, बिजुधावडी येथील अनेक कोरोणाबाधीत झाल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाची कसोटी लागणार. बाधीत रुग्णात डाॅक्टर सह आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने खर्‍या अर्थाने प्रशासनासमोर कोरोणाचे संकट उभे ठाकले आहे.
खाजगी डाॅक्टर सह दिग्गज नेत्यांचा समावेश कोरोणाबाधीत झाल्याने विलगीकरणाच्या प्रक्रियेसह अतीसंपर्कात असलेल्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आल्याची माहीती ता. वै. अधि. डाॅ. शशीकांत पवार यानी दिली. धारणी येथे अमरावती परतवाडा येथुन अनेक कर्मचारी येजा करत असल्याने त्यांच्यावरही करडी नजर ठेवावी लागेल. तालुक्यात एकुण ४३ रुग्णांची संख्या झाल्याने आरोग्य, महसुल व पोलीस विभाग यांच्यात कोरोणा प्रतिबंधाकरीता समन्वय अपेक्षीत आहे. जनता का रक्षक करीता नितीन दुरबुडे यांचा वृृृृृृत्तांत.
्््््््््््््््््््््््््््््््््््््

कावळाझिरी धबधब्यावर आंघोळ करण्याकरीता वनकर्मचारी वसुल करताहेत मोबदला.
धारणी नितीन दुर्बुडे ः
धारणी तालुक्यात येणाऱ्या कावळाझिरी या गावावरून जवळपास ४ किमी अंतरावर जंगलात असणाऱ्या धबधब्याला अचानक प्रसिद्धी मिळाल्याने धबधब्याचे सौंदर्य पाहण्यास लोकांनी मोठी गर्दी केल्याचे लक्षात येते. ही गर्दी वनकर्मचार्‍या करीता आर्थीक उत्पन्नाचा मार्ग झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. काही प्रत्यक्ष दर्शी कडून मिळालेली माहीती धक्कादायक असुन हा प्रकार एका वन कर्मचाऱ्याकडून होत असल्याचे समजते. हि बाब अतिशय निंदनीय व वन विभागाला मान शरमेने खाली घालवणारी असून याकडे वरिष्ठ अधिकारी तत्परतेने लक्ष घालतील काय ? आता हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवसेंदिवस वन क्षेत्रातील झाडे कमी होत असल्याचे चित्र असतांना मात्र वन कर्मचारीच नियमांचे उल्लंघन करीत असेल तर जंगल वाचणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत असून कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार दिसून येतो. जंगलात होणारी वन कटाई कडे आपले लक्ष केंद्रित न करता वन रक्षक धबधब्यावर आंघोळीस येणाऱ्या लोकांकडून पैसे वसूल करून धबधब्याचा आस्वाद घेण्यास परवानगी देण्याच्या कर्तव्यात वेळ वाया घालवत असेल तर जंगल सुरक्षित राहणार तरी कसे. असा सहज प्रश्न उपस्थित होतो, हा सर्व प्रकार अतिशय चौकसपणे चालत असल्याचे लक्षात येते. यामध्ये समाविष्ट असणारे वन कर्मचारी एक नसून अजून हि त्यांचे काही सोबती आहे, यासाठी कोणतेही पुरावे राहणार नाही याची पूर्णपणे काही साथीदारांकडून दक्षता घेतल्या जात असल्याची ही बाब समोर आली आहे. वन कर्मचारी जंगलाची पाहणी सोडून त्या धबधब्यावर काय करतात तेथे कोणती वन तस्करी होते असा सहज प्रश्न निर्माण होतो. कावळाझिरी येथे होणाऱ्या आर्थिक देवाण घेवाणीस वरिष्ठ अधिकाऱ्यांची मूक संमती तर नाही ना ? असा प्रश्न आता वन प्रेमी कडून उपस्थित केला जात आहे,

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें