जिल्हयाबाहेर जाण्यासाठी व जिल्हयात येण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

0
736

जिल्हयाबाहेर जाण्यासाठी व जिल्हयात येण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

धावाधाव न करता, घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करा

प्रा,संतोष सुरपाम

जिल्हा प्रतिनिधी जनता का रक्षक न्युज गडचिरोली
9420512851

गडचिरोली : प्रशासनाकडून संचार बंदीमध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी, विद्यार्थी तसेच इतर नागरीकांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. गडचिरोली जिल्हयाबाहेर व आत येणा-या इच्छुकांनी आपली नावे प्रशासनाकडे नोंदवावित असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. सदर नावांची यादी शासनाकडे पाठविण्यात येत आहे. लवकरच राज्य शासनाकडून याबाबत तातडीने प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरीकांनी काळजी न करता आपण आहे त्या ठिकाणी थांबून सहकार्य करावे. आम्ही तुम्हाला प्रवासाच्या परवानगीबाबत दिलेल्या संपर्क क्रमांकावर कळविणार आहोत असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
प्रशासनाकडे या प्रकारे करा आपल्या प्रवासाची नोंदणी : ज्यांना जिल्हयाबाहेर किंवा जिल्हयात यावयाचे आहे, त्यांनी पुढिल कोणत्याही एका प्रकारे माहिती नोंदवावी.
*वेबसाईट* : जिल्हाधिकारी गडचिरोली प्रशासनाच्या gadchiroli.gov.in या वेबसाईटवर आपण आपली माहिती भरू शकता.
दूरध्वनी : जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०७१३२ २२२०३१ या क्रमांकावर दूरध्वनी करून आपण माहिती देवू शकता.
ईमेल : जिल्हा प्रशासनाच्या dmcellgadchiroli@gmail.com या ईमेलवर नाव, सद्याचे ठिकाण व कुठे जावयाचे आहे तसेच संपर्क क्रमांक अशी माहिती पाठवावी.
प्रवासाठी लागणा-या ईपाससाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी: जिल्हयांतर्गत व बाहेर प्रवासासाठी परवानगी दिलेल्या ठिकाणी जाण्याकरीता ईपास आवश्यकच आहे. यासाठी शासनाच्या covid19.mhpolice.in या वेबसाईटवर अर्ज करणे पुर्वीप्रमाणेच आताही आवश्यक आहे. फक्त परवानगीबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर अर्ज केल्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करता प्रत्यक्ष न येता ०७१३२ २२२५०९ या क्रमांकावर ईपास बाबत चौकशी करावी.
मुंबई, पुणेसह रेड झोनमधून जिल्हयात येण्यास परवानगी नाहीच: गडचिरोली ग्रीन झोनमध्ये येतो. याठिकाणी सद्यातरी रेड झोन मधून प्रवाशांना जिल्हयात येण्यास परवानगी नाही असे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. शासनाकडून रेड झोनमधील हालचालींवर निर्बंध घातलेले आहेत. त्याठिकाणाहून कोणत्याही व्यक्तीला आतातरी परवानगी देण्यात येणार नाही. मात्र त्यांनी वरील ठिकाणी दिलेल्या संपर्कावर माहिती नोंदवावी. भविष्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी सदर माहीती आवश्यक आहे.
जिल्हयात येणा-यांनी आपली नोंदणी संबंधित ठिकाणच्या प्रशासनाकडेही करावी : गडचिरोली जिल्हयात येणा-या लोकांनी आपली नोंदणी या जिल्हयाच्या प्रशासनाबरोबरच तुम्ही आहात त्या ठिकाणच्या जिल्हा किंवा तालुका प्रशासनाकडेही करावी. जेणेकरून त्याठिकाणी तुम्हाला आवश्यक मदत वेळेत पुरविता येईल. तसेच प्रवासावेळी आवश्यक सूचनाही वेळेत देता येतील.
चूकीच्या माहितीवर विश्वास ठेवून धावाधाव करू नका: चूकीची माहिती जसे रेल्वे, बसने प्रवास सूरू झाला आहे किंवा इतर प्रकारची माहितीवर विश्वास न ठेवता आपण प्रशासनाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवा. अकारण धावाधव करू नका. प्रत्येक माहितीची खात्री करा. अफवांवर विश्वास ठेवून संसर्ग होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आवश्यक परवानगीबाबत प्रशासन नोंदणी केलेल्या प्रत्येकाला संपर्क साधणार आहे. तसेच याबाबत गडचिरोली जिल्हयात नोंदणी केलेल्या अर्जदारांना मेसेजही पाठविला जात आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें