जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
21

गडचिरोली,दि.22: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोजगार प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर कामगार हवे असलेल्या कंपन्यांना व रोजगार हवा असलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. कोविड-19 मुळे लॉकडाऊन घोषित केलेले असल्यामुळे जिल्हयातुन बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहेत. परंतु आता कारखाने / कंपन्या सुरु झाल्यामुळे कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याच प्रमाणे ते कामगार बाहेरगावी नोकरी करीत होते ते स्वगावी जिल्हयात परत आले आहेत. त्यामुळे आता काही अटी व शर्तीच्या आधारे सुरु झालेल्या नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठया प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10 वी, 12वी पास आयटीआय, फिटर, इलेक्ट्रिशियन, पॉलीटेक्नीक तसेच अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी शैक्षणिक पात्रता पास उमेदवारांनी कौशल्य रोजगार विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर आपली नोकरीबाबत नोंदणी करावी. नोंदणीकृत उमेदवारांना मुलाखतीबाबत तसेच पदभरतीबाबत सर्व कार्यवाही संबंधित कंपनी तसेच या कार्यालयाच्या सहभागातून होणार आहे. त्यामुळे आपण त्वरीत या विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी तसेच दि. 06,07 व 08 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले असल्यामुळे कार्यालयीन वेळेत या कार्यालयाचे क्रमांकावर 07132-222368 संपर्क साधावा असे, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रविण वा. खंडारे यांनी कळविले आहे.
प्रा,संतोष सुरपाम जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
जनता का रक्षक न्युज
9420512851

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें