जिल्ह्यात आज वडसा तालुक्यात ५ नवीन कोरोना बाधितांचे निदान

0
37

गडचिरोली(जिल्हा माहिती कार्यालय) : वडसा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात असलेले यामध्ये एसआरपीएफ मधील एक जवान (२९ वर्ष), दिल्लीहून परत आलेले वडील (५२ वर्ष) व मुलगी (१७ वर्ष) तर नागपूरहून परत आलेल्या दोन महिला (दोघींचेही वय ५० वर्ष) यांचे कोरोना अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह मिळाले.

वडसा येथे एसआरपीएफ बटालियन आल्यानंतर सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. पैकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला तर उर्वरित सर्वांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले आहेत. जिल्ह्यात नव्याने बटालियन दाखल झाल्यानंतर सर्वच सदस्यांना १४ दिवस विलगीकरण यात ठेवण्यात आले आहे. यानंतर दिल्ली येथून वडील व मुलगी देसाईगंज येथे आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणा ठेवण्यात आले होते त्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह मिळालेले आहेत. तर दोन महिला नागपूरहून वेगवेगळ्या दिवशी वडसा येथे आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक महिला एक दिवस घरी राहिल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी विलगीकरणात हलविण्यात आले.या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीव्र जोखमीच्या सर्व व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
प्रा,संतोष सुरपाम जिला प्रतिनिधी जनता का रक्षक न्युज गडचिरोली 9420512851

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें