डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाल्या विरोधात गुरुवारला अचलपुर परतवाडा बंदची हाक = प्रतिनिधी फिरोज खान. ज्वारीच्या पिकाचे जंगली डुकरा मुळे प्रचंड नुसकान प्रतिनिधी फिरोज खान. अचलपूर तालुक्यात 24 तासात मुसळधार वर्षा, नदी-नाल्यांना पूर = प्रतिनिधी फिरोज खान ,जनता का रक्षक न्यूज

0
100

# डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाल्या विरोधात गुरुवारला अचलपुर परतवाडा बंद ची हाक#
# ऍट्रयासीटी कायद्याचा दुरपयोग निषेधार्त विविध संघटनाचे निवेदन#
अचलपुर : -फिरोज खान परतवाडा शहरातील प्रतिष्ठीत संजीवणी हॉस्पीटल मध्ये १ सप्टेबरला तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या च रुग्णाच्या नातेवाईकाकडुन हॉस्पीटलचे डॉ. कमल अग्रवाल यांच्या विरोधात ऍटॅसीटी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या विरोधात जुळ्या शहरातील अनेक संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध व गुरूवारला अचलपुर परतवाडा बंद ची हाक देण्यात आली आहे.
जुळ्या शहरात च नव्हे तर सर्पुण जिल्हा त परीचीत असलेले डॉ. कमल अग्रवाल यांच्या रुग्णालयात १ सप्टेबर ला उपचारा दरम्यान एका रुग्णाशी वाद झाला होता. त्या नंतर तब्बल १८ दिवसांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकाने परतवाडा पोलिस स्टेशन मध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोप करत ऍट्रसीटी गुन्हा दाखल केला. सर्वाना सुपरीचीत असलेले डॉ कमल अग्रवाल असे करूच शकत नाही बदल्याच्या भावनेने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्या विरोधात एक निवेदन इंडीयन डेंटल एसोशिशन, निमा, परतवाडा अचलपुर, अग्रवाल समाज, खंडेलवाल समाज, ऑल ट्रेडर्स व्यापारी एसोशीएसन, रोटरी क्लब, जेसी आई, सराफा व्यापारी, संकल्पसेवा समिती, ड्रग एड केमीस्ट एसोशिएशन , यांच्या वतीने देण्यात आले.
कोरोणा काळातच नव्हे तर २४ तास रुग्णाच्या सेवेकरीता सदैव तत्पर असलेल्या कोरोना योद्धा वर सुडात्मक कारवाईचा निषेध करत दाखल केलेल्या गुन्हा वापस घ्यावा करीता २४ सप्टेबर ला जुळ्या शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवुन अचलपुर परतवाडा शहर बंद ची हाक देण्यात आली आहे.

प्रतिनिधी फिरोज खान
जनता का रक्षक न्यूज

््््््््््््््््््््््््््््््््््््

# ज्वारीच्या पिकाचे जंगली डुकरांमुळे प्रचंड नुकसान#
# नुकसान भरपाईची मागणी#
अचलपुर : फिरोज खान- अचलपुर शेत शिवारात जंगली डुक्करांचा हैदोस प्रंचड वाढला असुन हाती आलेले ज्वारीच्या पिकाची राखरांगोळी होत आहे. शहापुर, रायपुरा, अजितपुर, सुलतानपुरा भागातील शेत शिवारातील ज्वारीच्या पिकाचे प्रचंड नुकसान करत असुन त्यांच्या बंदोबस्ताची तसेच नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे.
महाराष्ट राज्याचे मुख्य पिक असलेल्या ज्वारी पिकाचा पेरा अतिशय कमी झाला असतांना. या वर्षी अचलपुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पेरे वाढले आहे. काही दिवसात हातात येणार तोच जंगली ड्कक कराचा हैदोसात ज्वारी निस्तनाभुत करूण टाकली . एकदा एका शेतात घुसले किंसंपुर्ण शेतातातील ज्वारी मोड्न टाकत आहे. अनेक शेतकऱ्यांनी फटाके , बुजगावणे लावले तरी देखील कळप चे कळप शेतात घुडघुस घालत आहे. अनेक शेतकरयांच्या शेताचे अतोनात नुकसान होत असतांना, वनविभाग मात्र काहीच उपाययोजना करतांना दिसत नाही.एकीकडे कायदा त२ दुसरी कडे वर्षभराचे पिक एका रात्रीत निस्तेनाभुत करणाऱ्या जंगली डुककर , हरीणांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक शेतकरी करत आहे.
रायपुरा शेत शिवारातील वानखडे यांच्या दोन एकर शेतापैकी एका एकर मधील ज्वारीचे पिक पुर्णतः डुककरानी जमीनदोस्त करून टाकले आहे तसेच शहापुर शेत शिवारातील मनीष बहादुरे यांच्या शेतातच जंगलीडुककर रांचा कळप वास्तव्यास आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात जायला घाबरत आहे.कृषी, व वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी अनेक शेतकरी करत आहे.
प्रतिनिधी फिरोज खान
जनता का रक्षक न्यूज

््््््््््््््््््््््््््््््््््््

# अचलपुर तालुक्यात २४ तासात मुसळधार वर्षा #
# नदी नाल्यांना पुर, अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान
अचलपुर :फिरोज खान – सोमवारी दुपारी तिन वाजता पासुन सततधार सुरू असलेल्या पावसाने २४ तासात नदया नाल्यांना पुर आला आहे. संपुर्ण पावसाळा भर न आलेल्या वेगाचा पाऊस आता बरसत असलयाने हाती आलेल्या कपाशी , ज्वारी, सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. तसेच तालुकातील सापन प्रकल्पाची चार दारे उघडण्यात आली आहे. तसेच बिच्छन ,पिली नदयां देखील पात्र भरूण पाणी वाहत आहे.
पावसाळा सपंत असतांना कमी दाबाचा पटटा निर्माण होऊन गेल्या २४ तासापासुन अचलपुर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसाळ्यात न बरसला एवढा गेल्या चोवीस तासात संर्पुण तालुक्यात बरसला आहे.तालुक्यातील सर्वच छोटया मोठ्या नाल्यना पुरू , तसेच सापन, बिच्छण, पिली, पुर्णा, चंद्रभागा , नदयांना पात्र भरूण पुरसदृष्य पाणी वाहत आहे. उत्तरा नक्षत्रात पडत असलेल्या पावसाने भुर्गभातील पाण्याची पातळीत वाढ होत असते त्यामुळे पडत असलेला पावसाचा फायदाच शेतकरयांना होणार आहे.
ज्या शेतऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली आहे असे कपाशी, ज्वारी, सोयाबीन पिक आता पकव झाले असुन काही भागात कपाशीच्या पहील्या वेचन्या आल्या आहेत , ज्वारी व सोयाबीन देखील पुर्णपणे भरले असुन पुठे पाऊस वाढत गेल्यास आणखी जास्त नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
प्रतिनिधी फिरोज खान
जनता का रक्षक न्यूज

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें