नागपूर येथील प्रभाग क्रमांक 13 येथील लहुजी साळवे उद्यान (अंबाझरी उद्यान) हे व्यायाम करण्याकरता उघडे करावे, नगरसेविका डॉक्टर परिणीता फुके यांच्या मागणीला मंजुरी- प्रतिनिधी चेतन भोंडे नागपूर

0
12

*प्रभाग क्र.१३ येथील लहुजी साळवे उद्यान ( अंबाझरी उद्यान)* हे मॉर्निंग वॉक व लहान मुलांना खेळण्याकरिता सुरु करण्याबाबत परिसरातील नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली. कोरोना महामारीच्या काळात शासनातर्फे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे लहुजी साळवे उद्यान हे काहीकाळाकरिता बंद करण्यात आले होते. परंतु सर्वत्र अनलॉक झाले असून अजून पर्यंत उद्यान सुरु करण्यात आले नसल्यामुळे नागरिकांना फिरण्याकरिता, व्यायाम करण्याकरिता इतरत्र जावे लागत आहे.
याबाबत *नगरसेविका डॉ. परिणीता फुके* यांनी नागरिकांची निवेदन घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चे मुख्य व्यवस्थापक श्री. आशुतोष सलील साहेब यांना निवेदन देऊन तात्काळ लहुजी साळवे उद्यान सुरु करण्याबाबत विनंती केली. त्या अनुषंगाने श्री आशुतोष सलील साहेब यांनी *दोन दिवसात उद्यान सुरु करण्यात येईल* असे आश्वासन दिले.
प्रतिनिधी चेतन भोंडे

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें