निसर्गाचे अद्वितिय सौंदर्य खुलवणारे निसर्ग रम्य ठिकाण टिपागड.

0
23

गडचिरोली जिल्ह्यातील गर्द वनराईत असलेल्या टिपागड – 3000 फुटावर 12 एकर जागेवर पसरलेल टिपागड तलाव आणि देवस्थान.
विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात टिपागड वसलेले आहे. टिपागड उंच डोंगरावर असल्याने त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या डोंगरावर असलेल्या तलावात बारमाही पाणी असते. निसर्गाचे हे एक अद्भूत आश्चर्य मानले जाते. उंचीवर वर्षभर पाणी असणारे हे एकमेव ठिकाणअसुन निसर्गाची किमया असल्याचे बोलले जाते. वन्यजीवांचेही येथे हमखास दर्शन होते. येथील तलावाजवळच प्रेक्षणीय डोंगर व टेकड्या आहेत. निसर्गाची निरव शांतता व विविध पक्ष्यांचा आवाज येथे हमखास अनुभवता येतो.

कोरची तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या टिपागड. ऐतिहासिक स्थळाच्या डागडुजीकडे शासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले असून सदर किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे…

टिपागडचा राजा पुरमशहाच्या दुदैवी मृत्यू नंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यासाठी तत्कालीन गुरुबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणल्या गेला त्याला कंटाळून गुरुबाबांनी टिपागडच्या ऐतिहासिक तलावात जलसमाधी घेतली अशी आख्यायिका टिपागड बाबत सांगितली जाते. शासनाने या स्थळाचा विकास केल्यास पर्यटनास वाव मिळेल
दिवाकर भोयर तालुका प्रतिनिधी जनताका रक्षक न्युज 9421660523

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें