*प्राध्यापक दामोदर झाडे यांना आचार्य पदवी बहाल. *रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे कोरेगाव वडेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प प्रवाशांची होतायत हाल. *रांगी येथील विलगीकरण करण कक्षात जेवणाची व्यवस्था करा *धारणी येथून प्रतिनिधी दिवाकर भोईर यांचा रिपोर्ट

0
29

दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी प्रा .दामोदर झाडे यांना आचार्य पदवि बहाल.

धानोरा येथील श्रि. जि. सि. पाटिल मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातिल भौतिकशास्र विभागप्रमुख प्रा. दामोधर झाडे यांना गोंडवाना विद्यापिठाव्दारा आचार्य पदवि बहाल करण्यात आलि .प्रा .झाडे यांनि प्राचार्य डाॅ .एम .एस. कोकोडे नेवजाबाई हीतकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी व एस. जे. ढोबळे, आर .टि. एम .नागपुर यांच्या मार्गदर्शनात फोटोमिनिसन्स प्रापरटिज आॅफ ब्लु एमिटिंग लॅम्प फास्फरस या संशोधन विषयावर गोंडवाना विद्यापिठात प्रबंध सादर केला होता. प्रा .झाडे यांच्या आचार्य पदवि प्राप्ति केल्या बदल संस्थाध्यक्ष मा. सौरभ रमेशचंद्र मुनघाटे संस्थेचे सचिव शालिनाताई मुनघाटे तथा महाविद्यालयाचे प्राचार्या डाॅ. विणा एम .जंबेवार तसेच महाविद्यालयातिल प्राध्यापक व कर्मचारि यांनि अभिनंदन केले.
्््््््््््््््््््््््््््््््््््््
दिवाकर भोयर -धानोरा प्रतिनिधि
रस्त्यावर पडलेल्या झाडाने कोरेगाव – वडेगाव मार्गाची वाहतुक ठप्प.प्रवाशांना होतोय ञास . *******************–*–**** आरमोरी तालुक्यातिल कोरेगाव वरुण वडेगाव निघनार्या रस्त्यावर झाड पडल्याने ह्मामार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. आरमोरी तालुक्यातिल शेवटचे गाव कोरेगाव असून रांगि धानोरा वरुण येनारे वाहने विहीरगाव मार्गे आरमोरी नागपुरला या मार्गावर जातात माञ नव्याने बांधलेल्या पुलाने येनार्या वाहनाची कोडि केलि .रुदीकरणासाठि खोदकाम केले माञ योगरितीने बुजविन्यात न आल्याने मोठमोठे खड्डे पडलेत खोल दानी निर्माण झाले त्यात पाणी भरल्याने वाहन निघने कठीण असल्याने या सर्व गाड्या कोरेगाव ते वडेगाव वरुण वैरागड -मानापुर रोडला लागतात.त्यामुळे नेहमीच वाहनांची व प्रवाशांची वर्दळ असते. मागिल हप्त्यात या परिसरात वादळी पाउस झाल्याने कोरेगाव पासुन १कि.मि.अतंरावर वडेगाव रस्त्यावर हीवराचे झाड पडल्याने सध्यातरी हा मार्ग बंद आहे. सध्यातरी वाहतूक ठप्प झाली .याचा नाहक ञास वाहन धारक व प्रवाशांना सोसावा लागत आहे. धानोरा तालुक्यातिल बर्याच गावातिल लोकांना व्यापार व इतर खरेदी करिता नेहमिच आरमोरी ला जावे लागते. त्यामुळे जनतेला या मार्गावरून ये -जा करावे लागते . .आजही पडलेला झाड त्याच स्थितीत असल्यामुळे या मार्गावरून भ्रमण करणाऱ्या प्रवाशांना व दुचाकी ,चारचाकी तसेच जड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे .संबंधित विभागाने वेळीच लक्षदेवून झाडाचा बंदोबस्त करुण वाहतुक नियमित करुण देन्याची मागणी लोकांनी केलि आहे.
््््््््््््््््््््््््््््््््््््

रांगी येथील विलगीकरण कक्षात जेवणाची व्यवस्था करा .मागणी **************************धानोरा तालुक्यातील रांगी येथे शासनाने विलगीकरण कक्षाची निर्मिती केली देश राज्य लाडावून झाल्यानंतर बाहेरून आलेल्या व्यक्तींना ठेवण्याकरिता येथील शासकीय आश्रम शाळेमध्ये विलगीकरण कक्षाची निर्मिती केली परंतु तिथे राहणाऱ्या व्यक्तींना मात्र कोणत्याही पद्धतीच्या चाय, नाश्ता व जेवणाची व्यवस्था नसल्याने सर्व व्यक्तींची गैरसोय होत असल्याने येथील विलगीकरण कक्षात जेवणाची व्यवस्था करून देण्याची मागणी लोकांनी केली. आहे . धानोरा तालुक्यातील धानोरा, मुरुमगाव, सोड आणि रांगी येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले त्यापैकी रांगी येथील शासकीय आश्रम शाळेमध्ये मुलांचे वस्तीगृह इमारत क्र.१ मधे विलगीकरण कक्षाची निर्मिती झाल्यानंतर . येथिल सेन्टरला सत्तर ते ऐंशी बेड ची व्यवस्था करण्यात आली .या इमारतीत आत्तापर्यंत शंभर ते दीडशे लोक विलगीकरण कक्षामध्ये आपला कालावधी पूर्ण करून घरी गेले. माञ पूर्वी च्या आणि आता च्या कोणत्याही व्यक्तिना चाय ,नास्ता ना जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पुर्वीही जेवनाची मागणी लोकांनी केली .आताही करित आहेत. सध्या स्थितीत रांगी शासकीय आश्रम शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये दहा व्यक्ती असून दहापैकी आठ पौढ आणि दोन मुली आहेत त्यापैकी 3 कन्हाळगाव येथिल असून रांगी पासून ५की.मी.अंतरावर गाव येथील असून बाकीचे सात लोक रांगी येथील आहेत .सध्या पावसाळ्याचे दिवस असून खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे रांगी आणि रांगी परिसरातील लोक पावसामुळे शेतीच्या हंगामात गुंतलेले आहेत त्यामुळे कोविड सेंटरमध्ये असलेल्या व्यक्तींना घरातील लोक वेळच्या वेळी पाणी पावसात डब्बा घेऊन देऊ शकत नाही. त्यामुळे येतील विलीगिकरण कक्षातच चाय, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी येथील लोकांनी केलेली आहे.एखादा पाँझेटिव्ह निघाला तर त्याची लागण इतरानां होवू शकते.खबर दारीचा उपाय म्हणून शासनाने आपल्या स्तरावर योग्य कारवाई करुण जेवन उपलब्ध करुण देण्याची मागणी येथिल लोकांनी केलि आहे. याबाबत येथील नोडल अधिकारी रामटेके यांना विचारले असता आमच्याकडे फक्त इमारत पाणी बेड आणि लाईटची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी आहे हे जेवणाबाबत ची व्यवस्था आमच्याकडे नाही. त्यामुळे इथे असलेल्या लोकांना गैरसोय होत असून जेवणा अभावी एखाद्या व्यक्तीच्या जीवाची हानी झाल्यास याला जबाबदार कोण अशा पद्धतीचा प्रश्न लोक विचारीत आहेत धानोरा तालुक्यातील धानोरा सोडे मुरुमगाव याठिकाणी जेवणाची व्यवस्था केली असून रांगी येथेच जेवण का नाही ही असा प्रश्नही ही लोकं विचारीत आहेत त्यामुळे येथील विलगीकरण कक्षामध्ये चाय नास्ता व जेवण उपलब्ध करून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे .

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें