बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ग्रामीण अमरावती पोलीस विभागाची जनजागृती मोहीम. * प्रतिनिधी सादिक शहा जनता का रक्षक न्यूज अमरावती

0
19

बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस विभागाचा जनजागृती

शेकडो शाळेत घेतला ऑनलाईन पेपर
संपूर्ण भारतात बाललैंगिक अत्याचारात वाढ झालेली आहे. त्यांच्यासह महिलांवरील होणाऱ्या अत्याचारात ही भरमसाठ वाढ झाली आहे. बाललैंगिक अत्याचार काय असतो याबाबत अनेक मुलांना माहित नसतो. असा प्रकार घडतं असतांना मदत म्हणून कोणाला आधी सांगायचं यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस विभाग वतीने वेबनार शालेय विध्यार्थीना माहिती देण्यात आली.
करोनामुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद असतांना वेबनारच्या साहाय्याने आता पर्यंत 15 हजार विध्यार्थीना अमरावती जिल्ह्यातील सर्वंच शहर ग्रामीण शाळेत माहिती देण्यात आली. या विषयावर शाळेतील विध्यार्थीना ऑनलाईन पेपर घेण्यात आले. त्याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली. बाल लैंगिक अत्याचार, महिला अत्याचार, जादू टोणा गुन्हे बाबत माहिती देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती ग्रामीण पोलीस विभागाने इतर कोणत्याही विभागाची मदत न घेता कर्मचारीच्या साहाय्याने संपूर्ण माहितीपट, वेबनार परीक्षा, कायदे विषयक माहिती प्रसारन करण्याचे कार्यक्रम घेण्यात आले. बाललैंगिक अत्याचार बाबत चित्रफिती बनून जनजागृती करण्यात आली. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनासुद्धा वेगवेगळ्या विषयावर लेखी परीक्षा घेऊन माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाललैंगिक अत्याचार, महिला अत्याचार गुन्हे कमी करणे विद्यार्थी तसेच महिलांमध्ये जनजागृती होणे हा प्रमुख उद्देश या कार्यशाळा बाबत आहे, असे हरी बालाजी यांनी स्पष्ट केले.

अमरावती प्रतिनिधी
साजिद शहा

कॅमेरामन
विक्की बाभुळकर

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें