बिरसा मुंडा योजना अंतर्गत बांधकाम केलेल्या विहिरीची केली तपासणी -प्रतिनिधी दिवाकर भोयर. ######बीएसएनएल परतवाडा विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे जुळ्या शहरात ग्राहक त्रस्त- प्रतिनिधी फिरोज खान . #########अचलपूर तालुक्यातील विविध विभागास सोबत राज्याचे राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांची आढावा बैठक -प्रतिनिधी फिरोज खान. #########पीक कर्ज वाटपासाठी डिजिटल स्वरूपाचा सातबारा ग्राह्य धरावा, असे सर्व बँकांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले निर्देश= प्रतिनिधी हरीश हजारे. ##########तिवसा मतदार संघात भाजपचा दणका, शेतकऱ्यांचे या हंगामातील प्रलंबित पिक कर्ज तात्काळ आवंटीत= प्रतिनिधी सुरेंद्र मानेकर. ##########तिवसा नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष वैभव दादा वानखेडे यांची नगरसेवक परिषद मुंबईच्या अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी निवड= प्रतिनिधी शुभम ठाकरे. जनता का रक्षक न्यूज

0
82

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधी ९४२१६६०५२३ . बिरसा मुंडा योजना अंतर्गत बांधकाम केलेल्या विहिरीचि केली तपासणी. धानोरा तालुक्यातील मुरुम गाव परिसरातील शेतकऱ्याच्या सन २०१८-१९ मधे केलेल्या विहिरीचे बांधकाम लताताई एम.पुन्घाटे जि.प.सदस्य गडचिरोली यांनी केली . शेतकर्ना सिंचन सुविधा व्हावि , शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात भर पडून आर्थिक परिस्थिती तर सुधारणा होन्याकरिता सरकारने बिरसामुंडा योजना राबविली. या योजने अंतर्गत मुरुम गाव परिसरातील सन २०१८-१९ या वर्षात विहिरीचे नव्याने बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर पावसात दोन ते तिन कि.मी.चालत जावून पहावी केली. . केलेल्या कामांचा दर्जा कसा आहे, कामपुर्ण झाले की नाही याचे संपूर्ण परिस्थितीचा आढावा लत्ता पुन्घाटे जिल्हा परिषद सदस्या यांनी घेतला यांचे सोबत ,श्री .के .एन .खोब्रागडे जेई जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग गडचिरोली व शेतकरी श्री बैशारखुराम कोठपरिया मुरुम गाव , कविता तुलावि ,रमनलाल मारगिर्या खेडेगाव आदी मान्यवर सोबत होते .

््््््््््््््््््््््््््््््््््््
बीएसएनएल परतवाडा विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे जुळ्या शहरात ग्राहक त्रस्त …

बीएसएनएल ची टेलिफोन व इंटरनेट सेवा गेल्या अनेक महिन्यापासून विस्कळीत …

शहरात ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी पार पाडत आहे फक्त एक कर्मचारी …

अचलपुर (फिरोज खान )- अचलपुर -परतवाडा जुळ्या शहरात बीएसएनएल विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे गेल्या २ महिन्यापासून दुरुस्तीच्या नांवावर टेलिफोन व इंटरनेट सेवा बंद पडल्याने वारंवार तक्रारी देऊन ही संबंधित वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यांने ग्राहक त्रस्त झाल्याचे चित्र जुळ्या शहरात पहावयास मिळत आहे .यामुळे मोठ्या प्रमाणात बीएसएनएल ची सेवा ग्राहक बंद करीत असल्याने जुळ्या शहरातून बीएसएनएल ची सेवा हद्दपार होणार असल्याच्या मार्गावर आहे .जुळ्या शहरात ग्राहकांना बीएसएनएल संबंधित नवीन टेलिफोन व इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागत आहे .अचलपुर शहरात एकच कर्मचाऱ्यांवर टेलिफोन व इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची जवाबदारी एकाच कर्मचाऱ्यावर असल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवड्या अभावी गेल्या २ महिन्यापासून हा कर्मचारी फक्त दुरुस्तीमध्ये व्यस्त असल्याने ग्राहकांना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे .बीएसएनएल संबंधित ग्राहकाच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रचंड रोष ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे .यामुळे जुळ्या शहरात बीएसएनएल ची सेवा हद्दपार होणार का ? याबाबत शंका निर्माण झाल्या आहे .जुळ्या शहरात बीएसएनएल ची टेलिफोन व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प असून जुळ्या शहरात बीएसएनएल ची टाकण्यात आलेल्या लाईन मध्ये पाणी गेल्याने गेल्या २ महिन्यापासून सुरू असलेल्या दुरुस्ती चे काम अद्यापही निकाली लागलेली नाही .बीएसएनएल ची सेवा सुरळीत करून जुळ्या शहरात ग्राहकांमध्ये विश्वासाचं नात व संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुळ्या शहरात ग्राहकाची संख्या बघता त्वरित कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी जनतेकडून होत आहे .

््््््््््््््््््््््््््््््््््््

अचलपुर तालुक्यातील विविध विभागासोबत राज्यांचे राज्यमंत्री ना .बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती त विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न ….

प्रलंबित विविध कामे त्वरित पूर्ण करण्याचे उपस्थिती त विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना ना.बच्चूभाऊ कडू यांचे निर्देश ….

अचलपुर (फिरोज खान )- अचलपुर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम,समाजकल्याण विभाग व अचलपुर न.प विभागाचे अधिकारी -कर्मचाऱ्यासह नुकतेच शहरातील नाका परिसरातील वृंदावन चौपाटी येथे विविध कामाचा आढावा बैठक राज्यांचे राज्य मंत्री व अचलपुर मतदार संघाचे आमदार ना.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती त संपन्न .या आढावा बैठकीत तालुक्यातील दलित वस्ती विकासकामासोबत समाजकल्याण विभाग , सा .बा व न.प विभागाकडून प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश ही राज्याचे राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांनी अधिकाऱ्यांना दिले .यावेळी राज्याचे राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू ,अचलपुर न.प मुख्याधिकारी राजेंद्र फातले ,सा. बा चे कार्यकारी अभियंता मेहत्रे सर, सा .बा उपकार्यकारी अभियंता वाट साहेब तसेच न.प व सा .बा विभागाचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते .
सर्व प्रथम ना.बच्चूभाऊ कडू यांनी जुळ्या शहरातील दलित वस्ती अंतर्गत न.प प्रशासनाकडून माहिती घेतली .त्यानंतर जुळ्या शहरातील घरकुल योजना ,रस्ते ,दलित वस्ती संदर्भित अहवाल सविस्तर माहिती ना. बच्चूभाऊ कडू यांच्या कडे अचलपुर न.प मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी सादर केली .अचलपुर न.प हद्दीतील घरकुल आवास योजनेचा आढावा व उपलब्ध निधी बाबत ना.बच्चूभाऊ कडू यांच्या कडे अचलपुर न.प मुख्याधिकारी यांनी सादर करून घरकुल योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाला त्वरित मार्गी लावून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश ना.बच्चूभाऊ कडू यांनी दिले .यासोबतच आठवडी बाजार एका छताखाली आणण्यासाठी तसेच अमृत योजनेचा प्रस्तावन.प प्रशासनाने त्वरित सादर करण्याचे सुद्धा ना.बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले .आणि विविध मुद्यावर चर्चा करून आवश्यक निर्देश ना.बच्चूभाऊ कडू यांनी दिले .या बैठकीला अचलपुर न.प माजी उपाध्यक्ष अनिल पिंपळे ,न.प नगरसेवक प्रवीण पाटील ,संजय तट्टे ,बंटी ककराणीया ,प्रहार चे नितीन आखूड ,पंजाब बेदरकर आदी उपस्थितीत होते .

्््््््््््््््््््््््््््््््््््््

*पीक कर्ज वाटपासाठी डिजीटल स्वरूपाचा सातबारा ग्राह्य धरावा असे सर्व बँकाना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आदेश **

*तलाठी यांच्या सही, शिक्क्यासाठी आग्रह धरून शेतकरी बांधवाची अडवणूक करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विविध बँकांच्या प्रतिनिधींना दिले**

अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दि.21 ऑगस्ट

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जवाटप व महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा बैठकीद्वारे आढावा जिल्हाधिकारी श्री.शैलेश नवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, डिजीटल सातबारा हा अधिकृत दस्तऐवज आहे. कर्जवितरण करतानाही तो ग्राह्य धरला पाहिजे. तलाठी यांच्या सही शिक्क्यासाठी आग्रह धरता कामा नये. कर्जवितरणासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत. त्याचप्रमाणे, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतक-यांना पीक कर्जाचे वितरण करताना आधार कार्ड, सातबारा व आठ-अ हीच कागदपत्रे मागावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुमारे ६९५ कोटी ३६ लाख रूपयांचे अर्थात उद्दिष्टाच्या चाळीस टक्के कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण कमी आहे. भारतीय स्टेट बँकेचेही कर्जवाटपाचे प्रमाण कमी असल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व बँकांनी पतपुरवठ्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करावे व कर्जवितरणाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

कर्जमुक्ती योजनेत अद्यापही सुमारे नऊ हजार १११ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण व्हायचे आहे. त्यात भारतीय स्टेट बँकेच्या २ हजार १६७, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या २ हजार ५०८ व बँक ऑफ महाराष्ट्रच्या १ हजार २५३ खातेदारांचा समावेश आहे. या बँकांनी संबंधित शेतक-यांशी संपर्क साधून शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने करून घ्यावे, असेही निर्देश मा. जिल्हाधिकारी यांनी दिले.

््््््््््््््््््््््््््््््््््््

तिवसा मतदार संघात भाजपचा दणका !
शेतकऱ्यांचे या हंगामातील प्रलंबित पीक कर्जे तात्काळ आवंटीत

शेतकऱ्यांची लुबाडणूक, फसवणूक व दिशाभूल…या अन्याया विरोधात भाजपाचा लढा..

इंडियन बँक मार्डी येथे काही दलालांच्या मध्यस्थी ने बँक प्रशासनाच्या वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ फेकत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पीक कर्ज वाटपात मोठ्या प्रमाणावर दलाली करत असल्याचे आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत.

हेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यां द्वारे निरक्षर वृद्धांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेणे व लक्षात आल्यावर लंपास केलेले पैसे छोट्या रकमेत परत करणे, काही शेतकऱ्यांना निकष न पाळता कर्ज देणे व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जा पासून वंचीत ठेवणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनेश सूर्यवंशी व तिवसा तालुका अध्यक्ष श्री मनोज अडसड यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले.

मार्डी इंडियन बँक प्रशासनाने काही प्रकरणे आजच्या आंदोलना मुळे श्री ज्ञानेश्वर राठोड भिवापूर या शेतकऱ्या सहीत अनेकांचे प्रलंबित पीक आज च आवंटीत झाले. या बाबतीत बँक प्रशासनाने महत्वाच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे न दिल्याने पुन्हा सोमवारी प्रलंबित प्रश्न व समस्यांवर चर्चा करून थेट समाधान काढण्यात येईल.

शेतकरी व निरक्षर वृद्धांच्या अज्ञानाचा फायदा घेत शेतकऱ्यांची लुबाडणूक, फसवणूक व दिशाभूल करण्यात येत आहे. बँक खात्यावरील नोंदी अद्ययावत नसणे, शेतकरी पीक कर्जाचे नियम व कर्जमाफीचे नियम तरोड मरोड करून सांगून शेतकऱ्यांना बँकेतून परत पाठविणे. श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातील रकमेचा त्यांना लक्षात येणार या पद्धतीने दुरुपयोग करणे, पीक कर्जाशी विनाकारण अन्य कर्ज खाते लिंक करून, संलग्न करून पीक कर्ज व कर्ज माफीत मनस्ताप देऊन मानसिक छळवणूक करणे, पीक विम्याचे एकाच पीकविमा अर्जा साठी दोन दोन दा प्रिमियम कापणे याने शेतकरी हैराण आहेत.

अमरावती जिल्ह्यासाहित अमरावती विभागात सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टी सर्व बँकांचे प्रशासन व सर्व बँक कर्मचारी संघटना यांना आवाहन करीत आहे की बँक व संघटनांची विनाकारण बदनामी करणारे असे कर्मचारी हुडकून काढून त्यांच्या वर कडक कार्यवाही करावी.

सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी यात ताबडतोब लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

दिनेश सूर्यवंशी
प्रदेश कार्यकारिणी सदस्य
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश

्््््््््््््््््््््््््््््््््््

तिवसा नगरपंचायत चे कर्तवय दक्ष नगराध्यक्ष वैभव दादा वानखडे यांची नगरसेवक परिषद मुबंई च्या अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्हाच्या पालकमंत्री ना. यशोमती ताई ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले व तुझा हातातून सकारात्मक कार्य घडो अशी अपेक्षा केली

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें