जनता का रक्षक न्यूज
#लोणार #सरोवराचे #पाणी #झाले “#गुलाबी”
बुलडाणा, 10 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : आज जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाले… लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले. दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली आहे.
प्रतिनिधी शेखर नागपाल
जनता का रक्षक न्यूज शेगांव