भिलोना येथील तलाठी यांचे कार्य कौतुकास्पद
@ शेतकऱ्यांना मिळतात वेळेवर सर्व कागदपत्रे
अचलपुर फिरोज खां :- अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या तलाठी साझा भिलोना येथील पटवारी सुनिल साखरे हे त्यांचे कर्तव्य अत्यंत जबाबदारीने बजावत शेतकऱ्यांना वेळेवर सर्व आवश्यक कागदपत्रे देत चांगले सहकार्य करीत आहेत यामुळे त्यांचे कार्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
तलाठी भिलोना येथे अनेक वर्षा पासून स्थायी पटवारी नसल्याने येथील शेतकरी व इतर आवश्यक कागदपत्र लागणाऱ्या नागरिकांना पायपीट करीत प्रभारी पटवारी परसापूर यांच्या कार्यालयात जावे लागत होते अशात जर पटवारी आले नाही तर वेळेवर मिळणारे दाखले अभावी नागरिकांना त्यांच्या कामास मुकावे लागत होते, परंतु जेव्हापासून साझा भिलोना तलाठी सुनील साखरे हे भिलोना कार्यालयात रुजू झाले तेव्हा पासून ते आपले कार्य चोख व जबाबदारीने बजावत रोज वेळेवर उपस्थित राहत नियमाने लोकांची कामे मार्गी लावत त्यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे वेळेवर उपलब्ध करुन देत असल्याने शेतकरी व नागरिकात त्यांच्या विषयी कार्यदक्ष पटवारी म्हणून भावना निर्माण झाली आहे. तसेच स्वच्छ पारदर्शक कार्य करीत साझा मध्ये येणाऱ्या परिसरातील अवैद्य गौण खनिज चोरांवर त्यांनी अंकुश लावत त्यांनी काही वाळू तस्करांचे टॅक्टर ऑन द स्पॉट पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. एवढेच नव्हेतर त्यांची टॅक्टर तहसील कार्यालयात जमा केली आहे यामुळे त्यांच्या दबंग वाळू माफियावरील कारवाईने तलाठी साखरे यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.