रांगी येथे आमचा गाव आमचा विकास आराखडा नियोजन कार्यशाळा संपन्न– प्रतिनिधी दिवाकर भोयर गडचिरोली. वैनगंगा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात मुलगा बेपत्ता तर मुलगी जखमी –प्रतिनिधी दिवाकर भोयर

0
25

*रांगी येथे आमचा गाव आमचा विकास आराखडा नियोजन कार्यशाळा संपन्न*.जनता का रक्षक न्यूज दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी.९४२१६६०५२३ ‌. गडचिरोली /धानोरा ‌. धानोरा तालुक्यातील रांगी येथे पंचायत समिती च्या वतिने पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत “आमचा गाव ,आमचा विकास “आराखडा नियोजन कार्यशाळा आज दिनांक 19 .10. 2020 ला दुपारी 12.00वाजता रांगी येथिल राजीव गांधी सेवा केंद्र भवन येथे पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी मा.शशिकांत साळवे भाजपा धानोरा तालुका अध्यक्ष, मुख्य मार्गदर्शक बंडू निमसरकार संवर्ग विकास अधिकारी धानोरा , तसेच मंचावर प्रमुख अतिथी म्हणून रामचंद्र काटेंगे पोलीस पाटील रांगी, तुलावी तलाठी ,आदी मान्यवर उपस्थित होते. रांगी -येरकड जिल्हा परिषद मतदार संघ (गट )निहाय पंधराव्या वित्त आयोगाचे अंतर्गत सन2020- 21 ते 2024 -25 या वर्षाचा “आमचं गांव, आमचं गाव” विकास आराखडा तयार करण्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तीही प्रत्यक्ष कृतिशील कार्यक्रमाअंतर्गत. या कार्यशाळेच्या माध्यमातून गावातील गाव, तलाव, शेती, सिंचन इत्यादीची माहिती घेऊन गावात असलेल्या समस्याचे तसेच कार्यालयीन नियोजन तयार करायचे होते. त्याकरिता कार्यशाळेतील उपस्थित मान्यवरांचे दोन गट पाडण्यात आले एक कार्यालयीन गट, तर दुसरा गाव गट. यामध्ये शिवार फेरी काढून कार्यालयाच्या आणि गावातील समस्यांचा आराखडा तयार करण्यात आला त्यातूनच अबंद निधी ,पाणीपुरवठा , हगणदारीमुक्त ,मानव विकास मिशन ,आरोग्य उपजीविका ,अशा पद्धतीच्या सर्व क्षेत्रातील समस्याचा आराखडा प्रत्यक्ष गावांमध्ये फिरून तयार करण्यात आला. यावेळी वनविभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, शिक्षक ,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.जी नेवारे सचिव यांनी तर संचालन सुधीर आखाडे प्रशासक तथा विस्तार अधिकारी आणि बोरकुटे ग्रामसेवक यांनी आभार मानले.

्््््््््््््््््््््््््््््््््््््
*वैनगंगा नदीच्या पुलावर झालेल्या अपघात मुलगा बेपत्ता तर मुलगी जखमी*

प्रतिनिधी दिवाकर भोयर जनता का रक्षक न्यूज धानोरा प्रतिनिधी 9421660523 गडचिरोली /आरमोरी

आरमोरी ते ब्रम्हपुरी- मुख्य महामार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावर मुलगा व मुलगी हे दोघेही दुचाकीने जात असतांना अचानक दुचाकी ही वैनगंगा नदीपुलाच्या डिवायडरला आपटलि आणि तोल जावुन मुलगा नदीत पडला तर मुलगी पुलावर पडून जखमी झाली. मुलगा व मुलगी दोघेही स्पेडर गाडि MH49BF3593 ने जात असताना अचानक गाडी लोखंडी खांबालाआपटली .त्यानंतर नियंत्रण सुटल्याने
त्यामध्ये दुचाकी चालक मुलाचा तोल जावून नदीपुलावरून नदीपात्राच्या पाण्यात पडून लुप्त झाला तर मुलगी ही पुलावर पडल्याने त्यामध्ये दुचाकी स्वार मुलगी जखमी झाली.

लगेच दुचाकी स्वाराला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असता दुचाकी स्वारांचा पत्ता लागला नाही.

दुचाकी चालक मुलाचे नाव इरफान शेख तर मुलिचे.नाव कळू शकले नाही.
दुचाकीचालक मुलगा हा दुचाकीस्वार मुलीला दुचाकी चालविण्याचे शिक्षण देत होता.
घटनेचा तपास सुरू असून नदीपात्राच्या पाण्यात लुप्त झालेल्या दुचाकी चालकाचा शोध संबंधीत विभाग करीत आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें