राज्यभरासह अमरावती जिल्हा अंतर्गत लालपरी धावणार ,ज्येष्ठांना प्रवासात मनाई, प्रशासनांना पाळावे लागणार आटी व शर्ती व तब्बल 58 दिवसानंतर रस्त्यावर धावणारा लालपरी =प्रतिनिधी नितीन दुरबुडे व सुनील भोरे

0
302

राज्यभरासह अमरावती जिल्हांतर्गत लालपरी धावणार. जेष्ठाना प्रवासात मनाई. प्रवाशाना पाळावे लागणार अटी व शर्ती. तब्बल ५८ दिवसानंतर रस्त्यावर दर्शन होणार एस.टी बसचे.
: (अचलपुर अमरावती वरून नितीन दुरबुडे सह सुनिल भोरे.यानी संकलीत केलेला वृृृृत्तांत) व बृृृृहन्नमुंबई झोन वगळता राज्यातील इतर भागात तब्बल दोन महिन्यांनंतर उद्या शुक्रवारपासून जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरू होत असून परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज या सेवेबाबतची नियमावली जारी केली.  राज्यातील रेड झोन वगळता जिल्हा अंतर्गत तालुका पातळीवर अटी व शर्तीसह  म.रा.परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा रस्त्यावर धावणार असल्याची माहीती आहे. रेड झोन व कन्टेनमेंट झोन वगळता राज्यातील ईतर विभागात एस.टी. बस सेवा लाॅकडाउनच्या चवथ्या कालखंडामध्ये केवळ जिल्हा हद्दीत सुरु होणार.
सिंधुदुर्ग, उस्मानाबाद,वर्धा, गोंदीया, वाशीम, गडचिरोली या ग्रिनझोन मध्ये तर रेडझोन मधील रत्नागिरी, सांगली, कोल्हापुर, रायगड, नंदुरबार, नगर, बिड, लातुर, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, जालणा, परभणी, भंडारा, अमरावती चंद्रपुर, पुणे, जळगाव, नाशीक औरंगाबाद, सातारा, पालघर, यवतमाळ,या जिल्हाभरात एका तालुक्यातुन दुसर्‍या तालुक्यात प्रवासी वाहतुक लालपरीच्या माध्यमातुन होणार आहे.रेडझोन मध्ये मात्र काही निर्बध असणार आहेत. औरंगाबाद महानगरपालीका, शहर वाहतुक शक्यता नाही मात्र तालुक्यात होईल.परतवाडा बसस्थानकातुन सकाळी ६.३० ला प्रथम बसफेरी अंजनगाव करीता तर चिखलदरा, वलगाव, चिखलदरा, धारणी असदपुर करीता बसेस सुटणार आहेत अशी माहीती बसस्थानक बल्लाळ साहेब यानी दिली.नियम खालीप्रमाणे असतील-तालुक्या अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
३. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
४. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवा�
: बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
६. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. 
जनता का रक्षक न्यूज
प्रतिनिधी नितीन दुरबुडे सह सुनील भोरे

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें