राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे दिवाळी मिलन कार्यक्रम रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवन दक्षिण नागपूर येथे आयोजन.

0
46

आज १७ . ११. २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , नागपूर शहर तर्फे “दिवाळी मिलन ” कार्यक्रम रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवन , दक्षिण नागपूर येथे आयोजित करण्यात आला . दिवाळी सणाचे औचित्य साधून पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याकरिता सर्वांचे लाडके , आदरणीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा .ना . श्री अनिल बाबू देशमुख , माजी मंत्री श्री रमेशचंद्र बंग साहेब यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते . याप्रसंगी प्रदेशचे पदाधिकारी सर्व शहर पदाधिकारी , फ्रँटल अध्यक्ष , उपस्थित होते . दिवाळी मिलन कार्यक्रम शहर कोषाध्यक्ष श्री बिरेंद्र यादुका यांच्या सौजन्याने करण्यात आला . या कार्यक्रमादरम्यान अनेक सामाजिक संघटना , जैन कलार समाजातील संचालक मंडळ , टि मर्चन्ट असोसिएशन , स्पाईसेस असोसिएशन , नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांनी मा. ना अनिलबाबू देशमुख साहेबांचे स्वागत केले .
याप्रसंगी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, राष्ट्रीय अल्पसंख्याक अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, आ प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, बजरंग सिंह परीहार, प्रदेश कार्याध्यक्ष सेवादल जानबाजी मस्के, दिलीप पनकुले ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, ग्रामीण कार्याध्यक्ष राजू राऊत, राजाभाऊ टाकसांडे, धनराज फुसे, सुरेश गुडघे पाटील,महादेवराव फुके, महिला अध्यक्ष अल्का ताई कांबळे, नूतन रेवतकर, श्रीकांत शिवणकर , विशाल खांडेकर, अशोक काटले, रवींद्र इटकेलवार, शैलेंद्र तिवारी, वर्षाताई श्यामकुळे, असे शहर चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें