राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 52 वा पुण्यतिथी महोत्सवात समाधीस्थळी लाऊड स्पीकर लावण्याची भाविक भक्तांना परवानगी मिळावी अशी मागणी= प्रतिनिधी सुरेंद्र मानेकर

0
35

*राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 52वा पुण्यतिथी महोत्सवात समाधीस्थळी लाऊड स्पीकर लावण्याची भाविक भक्तांच्या वतीने मागणी*

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज द्वारा संस्थापक अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम जिल्हा अमरावती या संस्थेच्या वतीने जगाला मानवतेचा संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव गेल्या 51 वर्षापासून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे विविध विधायक, रचनात्मक कार्यक्रमाने साजरा होत आहे. या कालावधीत संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समरसता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आदि समाज उद्धाराचे प्रबोधन केले जाते. तसेच म्हणून *मौन श्रद्धांजलीचा* दिवस हा मानवता दिन तथा सर्व संत स्मृतिदिन म्हणून साजरा होतो. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधी वर नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक भक्त येथे येतात. अर्थात या महोत्सवास भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
यावर्षी पुण्यतिथी महोत्सवाचे 52 वे वर्ष आहे. परंतु यावर्षी कोरोणा या वैश्विक महामारी च्या प्रादुर्भावाने हा महोत्सव महासमाधीस्थळी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता मर्यादित 50 भाविकांच्या उपस्थितीत आवश्यक ते अंतर राखून संपन्न करण्याचे संस्थेने ठरविले आहे. *शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोंबर ते शुक्रवार दिनांक 6 नोव्हेंबर 2020* या कालावधीत हा कार्यक्रम नियोजित असून कोरोना प्रादुर्भावामुळे भाविक तथा जनसामान्यांची काळजी लक्षात घेता व राष्ट्रीय कार्य म्हणून दिनांक पाच नोव्हेंबरला दुपारी 04:58 मिनिटांनी मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम मर्यादित 50 भाविकांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. मौन श्रद्धांजली च्या या कार्यक्रमाच्या वेळी महासमाधीस्थळ तथा आश्रम परिसरात जवळच्या गावातील भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून लाऊडस्पीकर द्वारे मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम प्रसारित प्रसारित करता येईल. जेणेकरून स्थानिक भाविकगण आपल्या घरातच बसून श्रद्धांजली अर्पण करतील. महासमाधीस्थळी कोणत्याही भाविकांनी उपस्थित राहू नये याकरिता वारंवार सूचना देणे आवश्यक असल्याने हा समाधीस्थळावर फक्त मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रमाकरिता लाऊड स्पीकर लावण्याची मागणी असंख्य भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना अधिकृत लेखी पत्राद्वारे विनीत पाखोडे संयोजक, रूपेश राऊत सहसंयोजक, विठ्ठल चौधरी, मयुर खवले, वेदांत मुंदाने, सागर सव्वालाखे, हर्षद नाथ आधी आध्यात्मिक समन्वय आघाडी अमरावती चा सक्रीय कार्यकर्त्यांनी केलेली आहे
प्रतिनिधी सुरेंद्र मानेकर
जनता का रक्षक न्यूज

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें