लॉक डाउन काळातील घरगुती व व्यापारी वर्गाचे लाईट बिल माफ करावे अशी मागणी. ०२- 85 वर्षांच्या साध्या मेंढपाळाने स्वतः एक-दोन नव्हे तब्बल 14 तलाव खोदले. ०३- नित्कृष्ट दर्जाचे सरकारी धान्य तांदूळ डाळ वाटपाबद्दल भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्यावतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यात आले ,पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची कार्यवाहीचे आदेश. ०४- पाथरूड येथील विद्युत कर्मचारी वसाहतीची झाली दैन्यावस्था ,वरिष्ठांचे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांना थाटावा लागला भाड्याच्या घरात संसार. ०५- तहानलेल्या तेलंखेडी सह पथरोट ला जलस्वराज्य योजनेने केले तृप्त. ०६- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका शहरात बँकांसमोर तुफान गर्दी. *जनता का रक्षक न्यूज*

0
18

व्यापाऱ्यां ची व घरगुती वापराचे हि बिल माफ करावे- शेखर शेखर नागपाल
शेगाव; मागील तीन महिन्याचे अवाच्या सव्वा आलेले विद्युत बिल शासनाने माफ करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शहराध्यक्ष शेखर नागपाल यांनी केली आहे महाराष्ट्र मध्ये 22 मार्च पासून लाकडं लागलेले आहे त्यामुळे तीन महिन्यापासून सर्वच प्रकारचे व्यवसाय जवळपास ठप्प असून हॉटेल केटरर्स लॉज मंगल कार्यालय भोजनालय इत्यादी व्यवसाय बंद असूनही या व्यवसायावर आश्रित कामगारांचा मोर उपासमारीची वेळ आलेली आहे तर व्यवसाय चालत आर्थिक संकटात सापडलेले आहेत अशा कोंडीत सापडलेल्या व्यवसायिकांना तसेच घरगुती वापर करणारे विद्युत ग्राहकांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अव्वाच्यासव्वा बिल दिलेले आहेत शासनाच्या आदेशाने लोक डॉन काळात सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेची बिले विद्युत ग्राहक भरणार कुठून असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक विचारत आहे राज्य शासनाने लोक डाऊन काळातील तीन महिन्याचे संपूर्णपणे विद्युत बिल माफ करून सर्वसामान्य विद्युत ग्राहक व व्यवसायिक यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेगाव येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेगाव संघर्ष समिती विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली यावेळी विद्युत ग्राहकांनी तोंडावर काळी पट्टी लावून विद्युत मंडळाच्या भूमिकेचा निषेध केला यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शेखर नागपाल विजय राठी राजकुमार व्यास मयूर मुना चंद्रशेखर धरम कुमार व्यास संदेश शेगोकार गौतम इंगळे विशाल शेगोकार कमलेश शर्मा प्रदीप सावना ईश्वर सावना विशाल गणोरकर चेतन सोनोने पाटील सुनील देशमुख अशोक वाधवानी देवानंद परियाल अशोक राठोड आदि विद्युत ग्राहक उपस्थित होते,

््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

८५ वर्षांच्या साधा मेंढपाळाने ,स्वतः एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले ???

बकऱ्यांना चारता चारता खोदले १४ तलाव, ४० वर्षांपूर्वी सुरूवात

नुकत्याच झालेल्या मन की बात मध्ये आदरणीय पंतप्रधानांनी केरे कामेगौडा या व्यक्तीचा उल्लेख केला…कामेगौडा कोण ? थोडी उत्सुकता जागी झाली आणि म्हटलं जाणून घ्यावं नक्की कोण आहे हा अवलिया??

जगात काही घडू शकत. असं आपणc बरेच वेळा म्हणतो आणि त्याची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. बिहारच्या दशरथ मांझीने पहाड खोदून मार्ग तयार केला होता, अगदी त्याच्यावर एक हिंदी चित्रपट ही येऊन गेला.अशाच एखाद्या चित्रपटाला साजेशी कामगिरी कामेगौडा यांची आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १४ तलाव खोदले या ८५ वर्षांच्या अवलियाने…कामेगौडा यांचं घर कर्नाटक येथील मांड्या गावातील डासनाडोड्डीमध्ये आहे. ते मेंढपाळ असून कुंदिनीबेट्टा गावाजवळ मेंढी चरवतात.

४० वर्षांपूर्वी ते जेव्हा मेंढ्या डोंगरावर चरायला जात, तेव्हा तेथे जनावरांना प्यायला पाणी नसल्याचं त्यांना लक्षात आलं.पहाडी जागा असल्याने तेथे पावसाचं पाणी जमा होत नसे. तेव्हा त्यांच्या डोक्यात तलाव बनवण्याची कल्पना आली.सुरवातीला ते काठीने खड्डा खोदत. मात्र ते त्यांना कठीण जाऊ लागलं. म्हणून त्यांनी काही अवजार विकत घेण्याचं ठरवलं.

आता मेंढपाळाकडे कुठले आले इतके पैसे? मग त्यांनी काही मेंढ्या विकून अवजार विकत घेतले व खड्डे तयार करण्याचं काम सुरु ठेवलं. पावसाळा आला, खड्ड्यांचं रूपांतर तलावात झालं. जनावरांना पाणी मिळू लागलं तसा कामगौडा यांचा उत्साह वाढू लागला.लोकांच्या टिंगल टवाळीकडे लक्ष न देता त्यांनी नव्या जोमाने त्यांनी अजून काही तलाव खोदले. त्यांनी २०१७ पर्यंत केवळ सहा तलाव बनवले होते मात्र गेल्या एक-दीड वर्षात लोकसहभागामुळे ही संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली. त्यांनी बनवलेले १४ तलाव हे एकमेकांशी जोडलेले आहेत, हे विशेष..!!

तसेच त्यांनी डोंगरावर जवळपास २००० वडाची झाडं देखील लावली आहेत.त्यांना या कार्यासाठी अनेक बक्षिसे मिळाली आणि जे पैसे मिळाले ते त्यांनी पुन्हा तलावांच्या निर्मितीसाठी वापरले…

कामेगौडा आज ही त्यांचं काम करत आहेत. त्यांचं घर डासनाडोड्डीमध्ये असून त्यांचा परिवार झोपडीत राहतो. कामेगौडा हे कुंदिनीबेट्टा गावाजवळ बकऱ्या चारतात. केरे सांगतात , मी सुरवातीला काठीने खड्डा खोदायचो हे खूप कठीण काम होत. त्यानंतर मी माझ्या जवळील काही मेंढ्या विकून खड्डे खोदण्यासाठी अवजारे विकत घेतली, आणि काम सुरु केले. खड्ड्यांचं रुपांतर तलावात झाल्यानंतर जनावरांना पाणी मिळतयं हे माझ्या लक्षात आले. हे पाहून मी माझ काम सुरू ठेवले.

कामेगौडा यांचा मुलगा म्हणतो – कुठलेही शिक्षण न झालेल्या माझ्या वडिलांनी पाण्याचा प्रवाह आणि इतर टेक्निक विकसित करून घेतल्या. माझे वडिल फक्त रात्री घरी येतात, दिवसभर ते डोंगरावरील आपली झाडे आणि तलावांची काळजी घेत असतात. त्यांनी स्वतःला या कामात एवढे झोकून दिले आहे की , ते ८५ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवेल असे न थकता काम करत आहेत

मा. पंतप्रधानांकडून अशा योग्य समाजरत्नांचा उल्लेख होतोय आणि त्यांचा यथोचित गौरव होत आहे, हे पाहून मनाला समाधान वाटत आहे. आपल्या ही आजूबाजूला असे अनेक दुर्लक्षित मांझी, कामेगौडा काम करत असतात, त्या सर्वांच्या कार्यास मनापासून सलाम… पत्रकार दीपक नितनवरे

्््््््््््््््््््््््््््््््््््््््््

*निकृष्ट प्रतीचे अमरावती जिल्ह्यामध्ये होणारे वाटपाबद्दल भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्यावतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदन*….आज दिनांक 29/6/2020 रोजी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या राजेश भाऊ वानखडे (संस्थापक अध्यक्ष भीम ब्रिगेड संघटना ) व प्रविण सुभाषराव मोहोड गतफुला ( जिल्हाध्यक्ष भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना) यांच्या वतीने . अमरावती जिल्हाच्या पालकमंत्री मा. यशोमती ताई ठाकूर यांना अमरावती जिल्हात वाटप चालू असलेल्या निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवठा सरकारी धान्य गहू, तांदूळ, दाळ, खूप निकृष्ट दर्जाची असून मा. पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.तसेच मा. माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांनी सुद्धा मा. यशोमती ताई ठाकूर यांना सांगितले की धान्य पुरवठा खूप निकृष्ट दर्जचा होत आहे. व अन्न पुरवठा अधिकारी व ठेकेदार व दुकानदार जर दोषी आढळून येतील तर त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. म्हणून पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी लगेच आर. डी. सी. साहेब यांना कार्यवाही करण्यास सांगितले.
भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी निवेदनाची दखल घेतल्या बद्दल जाहीर आभार ..
यावेळी उपस्थित सर्व भीम ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी
राजेश भाऊ वानखडे (भीम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष)
प्रविण सुभाषराव मोहोड (भीम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष)
अंकुश (आठवले विद्यार्थी शहर प्रमुख)
ऋषिकेश उके (विद्यार्थी तालुका प्रमुख)
विक्रम भाऊ तसरे (जिल्हा संघटक)
उमेश दुर्योधन (अमरावती शहर प्रमुख)
नितीन भाऊ काळे (अमरावती शहर कार्याध्यक्ष)
शेख ईशाद (जिल्हा उपप्रमुख)
निलेश बोडखे (जिल्हा संपर्क प्रमुख)
हर्षल भोगे ( विद्यार्थी शहर उपाध्यक्ष)
सुशील चोरपागर (विद्यार्थी शहर संपर्क प्रमुख)
आदी उपस्थित होते…. पत्रकार दीपक नितनवरे

्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

पथ्रोट येथील विद्युत कर्मचारी वसाहतीची झाली दयनीय अवस्था.
वरिष्ठांचे दुर्लक्ष कर्मचाऱ्यांना थाटावा लागतो भाड्याच्या खोलीत संसार.
पंधरा वर्षांपासून कर्मचारी भाड्याच्या खोलीत.
पथ्रोट
बंद पडलेला पाण्याचा हातपंप, सर्वत्र वाढलेली झाडाझुडपानी वसाहत परीसर, छताला लागली गळती, तुटलेल्या खिडक्या व दरवाजे यासह इतर कारणांमुळे पथ्रोट येथील 32 केव्ही उपकेंद्र विद्युत अधिकाऱी कर्मचाऱ्यांच्या निवासाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.त्यामुळे पंधरा वर्षांपासून निवासात कोणत्याही अधिकार्‍यानी ढुंकूनही पाहिले नाही. निवासस्थान राहण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना भाड्याची खोली घेवून त्यामध्ये संसार थाटावा लागत आहे. विशेष म्हणजे मागील काही 15 वर्षापासून वसाहतीतील निवास स्थानाची दुर्दशा झाली असताना देखील या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबाची हेळसांड थांबवण्यासाठी या पडक्या अवस्थेत असलेल्या निवासाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पथ्रोट उपकेंद्राअर्तगत काही गावे गोंडवाघोली कुंणबी वाघोली जनुना शहानुर वाघडोह बोराळा पायवीहीर या आदिवासीबहुल ह्या गावासह कासंमपुर रामापूर जवलापूर पथ्रोट गावातील शेतकरी सह गावठान चा भार जास्त असल्याने केव्हाही ट्रान्सफार्मर बंद पडतात. त्यामुळे तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ह्यामुळे कोणी मुख्यालयी राहत नसल्याने पथ्रोट येथील विद्युत शाखा अभियंत्यांना कार्यालयात येण्याकरता वेळ लागतो. तोपर्यंत कोणताही कर्मचारी कामावर जात नाही त्यामुळे मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वास्तव्य असल्याशिवाय वेळेवर कामाला सुरुवात होणार नाही लाखो नागरिकांच्या शेतकर्‍याच्या हिताकरीता व सोईसुविधा करीता पथ्रोट उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या निवासस्थानाचा पंधरा वर्षापासून कोणीही दुरुस्ती साठी पाठपुरावा केला नाही अधिकारी-कर्मचारी मस्त तर ग्राहक त्रस्त अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत आहे,
पावसाळ्यातील रात्री-बेरात्री लाईटचा लपंडाव असतो तर कधी हवेने तार तुटतो ट्रान्सफार्मर बंद पडतात त्यावेळी अचानक बंद पडलेला वीज पुरवठा सुधारित करण्याकरता सकाळची वाट पाहावी लागते
पंधरा वर्षांपासून विद्युत वितरण कंपनी चे शाखा अभियंता मुख्यालयी राहत नसल्याने विद्युत विभागाचे निवासस्थाने बेभरवश्यावर पडल्याने क्षतिग्रस्त झाले आहे त्यामुळे सर्व निकामी पडले आहे त्यामुळे हि निवासस्थाने दुरूस्ती करणे गरजेचे आहे पण वरिष्ठ अधिकारी दुरुस्ती ची काळजी घेत नाही हे दुरूस्ती केल्याशिवाय जनतेला योग्य सेवा मिळु शकत नाही.
प्रमोद निर्मळ
जनता का रक्षक न्यूज

्््््््््््््््््््््््््््््््््््््

तहानलेल्या तेलंगखडीसह पथ्रोटला जलस्वराज्यने केले तृप्त. / जि.प.सदस्या मंगरोळे व योगेश दुबे नी घेतले अथक प्रयत्न.

उन्हाळ्यासह पावसाळ्यात पथ्रोटकर पाण्यासाठी दाहीदिशा भटकत असताना आज अखेर नजीकच्या शहानुर जलाशयातुन १६ कोटी ५९ लाख रुपये खर्चुन जलस्वराज्य योजने अंतर्गत गावकर्‍यांच्या घरात पाणी लाॅकडाऊन काळात पोहल्याने पथ्रोटकरानी समाधानाचा श्वास घेतला.सदर्हु जलस्वराज्य योजना पाणीपुरवठा स्वच्छता समीती अध्यक्ष तथा जि.प. सदस्या वासंतीबाई मंगरोळे, सचिव योगेश दुबे यांच्या अथक प्रयत्नातुन साकारली असुन पुर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.
कोरोणा महामारीच्या काळात लाॅकडाऊन असल्याने पाणीपुरवठा करण्यास बर्‍याच अडचणी आल्या असताही न डगमगता पाणी पोहचवण्याचे उद्दीष्ठ गाठले. शहानुर जलाशयातुन मुख्य जलवाहीनी १० किमी लांबीची असुन २ नविन व १ जुन्या जलकुंभातुन ९६०००० लीटर जल ३४ किमीच्या लांबीच्या वितरीकेतुन अंदाजे ४५०० पाणीपट्टीधारकाना वितरीत होणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम पुर्ण न झाल्याने तुर्त वितरीत होणार्‍या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करण्याचे फक्त वापराठी करावा असे आवाहन पाणीपुरवठा स्वच्छता समीतीने केले आहे.
देवराव बडवाईक यांचे प्रमुख उपस्थितीत वार्ड क्र.२ तेलंगखडी मधील नवीन जलकुंभातुन पाणी वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.सरपंच गोपाळराव कावरे, ग्रामविकास अधि.सौ.हर्षदा बोंडे, जगदेवराव सावळे, अजय वर्मा, राजेंद्रजी दुबे जेष्ठ स्वंयसेवक, मुरारी अग्रवाल सुधीर खडेकर आरिफ भाई आणि हनिफभाई, कैलास चव्हाण सह पाणीपुरवठा स्वच्छता समीती सदस्य हजर होते.
जनता रक्षक साठी आमचे प्रतिनिधी प्रमोद निर्मळ.

््््््््््््््््््््््््््््््््््््््््

दिवाकर भोयर जनता का रक्षक धानोरा प्रतिनिधि 9421660523 *खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेसमोर तोबा गर्दी*

*शारिरीक दुरिचा फज्जा*

:-पंतप्रधान, मुख्यमंत्रीपासून ते गाव पातळीवर सर्वच जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.मात्र बँकांसमोर गर्दी करणारे ग्राहक काही ऐकायला तयार नाहीत. शारिरीक दुरि (विशिष्ट अंतर) तर त्यांनी ऐसी की तैसी करून ठेवली आहे. को ऑफ बँकेच्या समोर तर ग्राहकांनी कहरच केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कुरखेडा तालुका मुख्यालयात कोरोनाचा संकट कसा टळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कुरखेडा तालुकाझ मुख्यालयात , स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया,दि डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑफरेटिव्ह तसेच इतर मिनि बँक चया शाखा आहे.तरि पण बँकासमोर तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.दि डिस्ट्रिक्ट को-ऑफरेटिव्ह बँक शाखा कुरखेडा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया कुरखेडा येथे सर्वात जास्त गर्दी आढळून येत असून शारिरीक दुरिला ला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
पावसाळीत खरिप शेती हंगामाच्या कामाला सुरुवात झाली असून शेतीच्या कामा करिता पैसे काढण्याकरिता बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे तसेच सध्या धानाचे बोनस,निराधार योजनेची रक्कम,उज्वला गॅस तसेच पंतप्रधान किसान बेनिफिट योजनेचे रक्कम नागरिकांच्या खात्यात जमा झाले आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांनी आपापल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी करताना दिसत आहेत.
या अगोदर सुध्दा कुरखेडा तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे.मात्र,बँकेसमोरील तोबा गर्दीने शारिरीक दुरि, मास्कचा वापर न करने अनेक दुकानंदानी रोडपर्यंत केलेला अतीकमण, बँके बाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे असल्याने त्यांना ना कोरोनाची भीती ना चिंता नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अश्या परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची काढजी स्वतः घेणे आवश्यक आहे. मात्र असल्या प्रकारचे चित्र दिसून येत नाही व प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे.

्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें