स्वर केसरी बहुउद्देशीय संस्थेचे अंतर्गत भातकुली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न- प्रतिनिधी हरीश हजारे भातकुली

0
67

*स्वर केशरी बहूउद्देशिय संस्थेचे अंतर्गत भातकुली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम साजरा*

अमरावती जिल्हा प्रतिनिधी
हरीश हजारे
जनता का रक्षक न्यूज

,दि. ५ रोजी भातकुली येथे स्वरकेसरी बहुउद्देशीय संस्था अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वंदनीय राष्ट्रासंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे व आसनाचे पुजन करून दिप प्रज्वलन कांबळे भंत्तेच्या हस्ते करण्यात आले. नंतर राष्ट्रसंत विरचित श्रध्दांजलीय भजनाच्या कार्यक्रम स्वरकेसरी संगीत क्लास भातकुली व्दारा सादर करण्यात आला. नंतर महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.त्या नंतर सर्व धर्माच्या प्रार्थना घेण्यात आल्या. नंतर आरती व सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज पुरी ( संचालक स्वरकेसरी संगीत क्लास भातकुली ) तसेच अतुल भाऊ वर्हेकर, सागर भजभूजे, नरेश गोलाईत, प्रफुल पवार, धनंजय वट्टववार, कार्तिक तिडके, दद्दु पातालीय, राजदीप ठाकूर, यश कहाते, साईकिरन भजभूजे, आयुष धारगावे,

विशेष सहकार्य- स्वरकेसरी संगीत क्लास भातकुली, साई गुरूदेव भजन मंडळ, गजानन भजन मंडळ, महर्षी वाल्मिकी भजन मंडळ, विशाल साऊंड सर्व्हीस कोलटेक.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें